नवी दिल्ली | आज भारताचा ७० वा प्रजासत्ताक दिन. नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारताने २६ जानेवारी १९५० रोजी संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी २६ जानेवारी १९३० साली लाहोर अधिवेशनात भारताचा तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. या ऐतिहासिक दिवसाची आठवण म्हणून २६ जानेवारीला राज्यघटना अंमलात आणण्यात आली.
प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत २६ जानेवारी रोजी एक मोठे संचलन आयोजित केले जाते. हे संचलन रायसीना हिल ते राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. या संचलनासाठी आता दिल्लीचा राजपथ सज्ज झाला आहे. प्रजासत्ताक दिनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. पंतप्रधानांचे तर राष्ट्रपतींचे प्रमुख पाहुण्यांसोबत राजपथाच्या मुख्य मंचावर आगमन होते.
- वायुदलाची चित्तथरारक प्रात्यक्षिके
राजपथावर भारतीय सैन्याकडून साहसी प्रात्यक्षिकांना सुरुवात #HappyRepublicDay2019 #गणतंत्रदिवस#RepublicDayIndia #70thRepublicDay #प्रजासत्ताकदिन pic.twitter.com/JYorszjGOz
— HW NEWS MARATHI (@hwnewsmarathi) January 26, 2019
- राजपथावर भारतीय सैन्याकडून साहसी प्रात्यक्षिकांना सुरुवात
- आज भारताचा ७० वा प्रजासत्ताक दिन
- भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो
- राजपथावर ‘स्वच्छ भारत, स्वस्थ भारत’चा संदेश
- राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांची सलामी
- कुटीर उद्योगावर आधारित आसामचा चित्ररथ
- उत्तराखंडच्या सुरेख चित्ररथाचे संचलन
- महाराष्ट्रासह गोवा, अंदमान-निकोबार, अरुणाचल प्रदेश, आसाम या राज्यांचे सुरेख चित्ररथ राजपथावर
गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने 'छोडो भारत' या ऐतिहासिक चळवळीवर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावर#HappyRepublicDay2019 #गणतंत्रदिवस#RepublicDayIndia #70thRepublicDay #प्रजासत्ताकदिन pic.twitter.com/22DVuhRcQA
— HW NEWS MARATHI (@hwnewsmarathi) January 26, 2019
- महाराष्ट्रासह देशातील १५ राज्यांच्या चित्ररथांची निवड
- १९४२ च्या छोडो भारत आंदोलनाची आठवण जागविणारा महाराष्ट्राचा चित्ररथ
- सागर मोहाले यांच्या नेत्तृत्त्वाखाली एनसीसीचे शानदार संचलन
महाराष्ट्राच्या सागर मोहाले यांच्या नेत्तृत्त्वाखाली एनसीसीचे शानदार संचलन#HappyRepublicDay2019 #गणतंत्रदिवस#RepublicDayIndia #70thRepublicDay #प्रजासत्ताकदिन pic.twitter.com/yjmIS8U4GQ
— HW NEWS MARATHI (@hwnewsmarathi) January 26, 2019
- गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने ‘छोडो भारत’ या ऐतिहासिक चळवळीवर आधारित महाराष्ट्राचा दिमाखदार चित्ररथ राजपथावर
- राजपथावर भारताच्या विविधतेचे, समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या चित्ररथांचे संचलन
सीमा सुरक्षा दलाच्या बँडचे उंटांवर स्वार होऊन अनोखे संचलन #HappyRepublicDay201 #गणतंत्रदिवस#RepublicDayIndia #70thRepublicDay #प्रजासत्ताकदिन pic.twitter.com/695tDVbAeM
— HW NEWS MARATHI (@hwnewsmarathi) January 26, 2019
- सीमा सुरक्षा दलाचे उंटांवर स्वार होऊन अनोखे संचलन
- आझाद हिंद सेनेचे शानदार संचलन
- भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांचे शानदार शक्तिप्रदर्शन
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘वर्षा’ या आपल्या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी आपल्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण केले. #HappyRepublicDay201 #गणतंत्रदिवस#RepublicDayIndia #70thRepublicDay pic.twitter.com/ycACox8GIl
— HW NEWS MARATHI (@hwnewsmarathi) January 26, 2019
- राजपथावर भारतीय वायू सेनेच्या दिमाखदार संचलनाला सुरुवात
- राजपथावर माजी सैनिकांचे शानदार संचलन
- शीख रेजिमेंटचे राजपथावर दिमाखदार संचलन
- के-९ वज्र तोफांची राष्ट्रपतींना सलामी
- कॅवेलरी रेजिमेंटचे शानदार संचलन
- राजपथावर भारतीय सैन्याच्या सामर्थ्याचे दर्शन
राजपथावर भारतीय सैन्याच्या सामर्थ्याचे दर्शन #republicdayindia #70thRepublicDay #HappyRepublicDay2019 pic.twitter.com/bJJcOAJVHy
— HW NEWS MARATHI (@hwnewsmarathi) January 26, 2019
- राजपथावर भारतीय सैन्याच्या संचलनाला सुरूवात
- लान्स नायक नजीर वाणी यांना मरणोत्तर अशोकचक्र
- ध्वजारोहणानंतर राजपथावर २१ तोफांची सलामी
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामफोसा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित #RepublicDay2019 #70thRepublicDay pic.twitter.com/o7qwXJuQU8
— HW NEWS MARATHI (@hwnewsmarathi) January 26, 2019
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
- पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपतींसह प्रमुख पाहुण्यांचे स्वागत
- दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामफोसा हे प्रमुख पाहुणे म्हणून राहणार उपस्थित
- पंतप्रधान मोदी राजपथावर दाखल
- संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन राजपथावर दाखल
- उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू राजपथावर दाखल
- थोड्याच वेळात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद राजपथावर दाखल
- पंतप्रधान मोदींचे अमर जवान ज्योती येथे अभिवादन
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शहिदांना मानवंदना थोड्याच वेळेत राजपथावर संचालनाला सुरवात होणार. #RepublicDay2019 #70thRepublicDay pic.twitter.com/Jun6wcOBUU
— HW NEWS MARATHI (@hwnewsmarathi) January 26, 2019
- पंतप्रधान मोदींकडून शहिदांना मानवंदना
- देशाचे संरक्षणमंत्री, तिन्ही लष्करप्रमुख राजपथावर उपस्थित
- पंतप्रधान मोदी अमर जवान ज्योती येथे दाखल
- भारतीय सैन्याच्या संचलनासाठी दिल्लीचा राजपथ सज्ज
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.