HW News Marathi
देश / विदेश

Republic Day | हे आहेत आतापर्यंतचे परराष्ट्रीय प्रमुख पाहुणे

भारतीय प्रजासत्ताक दिनाला गणराज्य दिन असेही संबोधले जाते. भारतीय संविधान समितीने २६ नोव्हेंबर १९४९ साली भारताचे संविधान स्वीकारले. २६ जानेवारी १९५० सालापासून भारतीय संविधान अंमलात आणण्यात आले. जवाहरलाल नेहरू यांनी २६ जानेवारी १९३० साली लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. या दिवसाची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.

भारताच्या राजधानी दिल्लीत २६ जानेवारी रोजी एक मोठे संचलन आयोजित केले जाते. हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणार्‍या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते.

वर्ष प्रमुख अतिथी देश

 

१९५० – राष्ट्रपती सुकर्णो इंडोनेशिया

१९५१

१९५२

१९५३

१९५४ – राजा जिग्मे दोर्जी वांग्चुक भूतान

१९५५ – गव्हर्नर जनरल मलिक घुलाम मुहम्मद पाकिस्तान

१९५६

१९५७

१९५८

१९५९

१९६० राष्ट्रपती क्लिमेंट वोरोशिलोव्ह सोव्हिएत संघ

१९६१ राणी एलिझाबेथ दुसरी युनायटेड किंगडम

१९६२

१९६३ राजा नोरोडोम सिहांनौक कंबोडिया

१९६४

१९६५ खाद्य व शेतीमंत्री राणा अब्दूल हमिद पाकिस्तान

१९६६

१९६७

१९६८ पंतप्रधान अलेक्सेइ कोसिजिन सोव्हिएत संघ

राष्ट्रपती जोसेफ ब्रोझ टिटो युगोस्लाव्हिया

१९६९ पंतप्रधान टोडोर झिव्हकोव्ह बल्गेरिया

१९७०

१९७१ राष्ट्रपती ज्युलिअस न्यरेरे टांझानिया

१९७२ पंतप्रधान शिवसागर रामगुलाम मॉरिशस

१९७३ राष्ट्रपती मोबुटु सेसे सेको झैर

१९७४ राष्ट्रपती जोसेफ ब्रोझ टिटो युगोस्लाव्हिया

पंतप्रधान सिरिमावो भंडारनायके श्रीलंका

१९७५ राष्ट्रपती केनेथ काँडा झांबिया

१९७६ पंतप्रधान जाक शिराक फ्रान्स

१९७७ प्रथम सचिव एडवर्ड जिरिएक पोलंड

१९७८ राष्ट्रपती पॅट्रिक हिलेरि आयर्लंड

१९७९ पंतप्रधान माल्कम फ्रेझर ऑस्ट्रेलिया

१९८० राष्ट्रपती व्हॅलेरी जिस्कॅर देस्तें फ्रान्स

१९८१ राष्ट्रपती होजे लोपेझ पोर्तियो मेक्सिको

१९८२ राजा हुआन कार्लोस पहिला स्पेन

१९८३ राष्ट्रपती शेहु शगारी नायजेरिया

१९८४ राजा जिग्मे सिंग्ये वांग्चुक भूतान

१९८५ राष्ट्रपती राउल अल्फोन्सिन आर्जेन्टिना

१९८६ पंतप्रधान आंद्रिआस पापेन्द्रु ग्रीस

१९८७ राष्ट्रपती ॲलन गार्शिया पेरू

१९८८ राष्ट्रपती जूनिअस रिचर्ड जयवर्धने श्रीलंका

१९८९ जनरल सेक्रेट्री ङुयेन वॅन लिन्ह व्हिएतनाम

१९९० पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ मॉरिशस

१९९१ राष्ट्रपती मॉमून अब्दुल गय्यूम मालदीव

१९९२ राष्ट्रपती मारिओ सोआरेस पोर्तुगाल

१९९३ पंतप्रधान जॉन मेजर युनायटेड किंग्डम

१९९४ पंतप्रधान कोह चोक थोंग सिंगापूर

१९९५ राष्ट्रपती नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिका

१९९६ राष्ट्रपती डॉ. फर्नान्डो हेनरिके कार्दोसो ब्राझील

१९९७ पंतप्रधान बसदेव पांडे त्रिनिदाद आणि टोबॅगो

१९९८ राष्ट्रपती जॅक शिराक फ्रान्स

१९९९ राजा वीरेंद्र वीर विक्रम शाह देव नेपाळ

२००० राष्ट्रपती ओलुसेगुन ओबासान्जो नायजेरिया

२००१ राष्ट्रपती अब्देलअझीझ बुटेफ्लिका अल्जीरिया

२००२ राष्ट्रपती कस्साम उतीम मॉरिशस

२००३ राष्ट्रपती मोहम्मद खातामी इराण

२००४ राष्ट्रपती लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा ब्राझील

२००५ राजा जिग्मे सिंग्ये वांग्चुक भूतान

२००६ देशध्वज अब्दुल्ला बिन अब्देलअझीझ अल-सौद सौदी अरेबिया

२००७ राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन रशिया

२००८ राष्ट्रपती निकोला सार्कोझी फ्रान्स

२००९ राष्ट्रपती नुरसुल्तान नझरबायेव कझाकस्तान

२०१० राष्ट्रपती ली म्युंग बाक दक्षिण कोरिया

२०११ राष्ट्रपती सुसिलो बांबांग युधोयोनो इंडोनेशिया

२०१२ पंतप्रधान यिंगलक शिनावत थायलंड

२०१५ राष्ट्रपती बराक ओबामा अमेरिका

२०१६ राष्ट्रपती फ्रान्स्वॉ ओलांद फ्रान्स

२०१७ राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान संयुक्त अरब अमिराती

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय वंशाचे पत्रकार ब्रह्म कांचीबोटाला यांचे कोरोनामूळे न्युयॉर्कमध्ये निधन

News Desk

जाणून घ्या…का साजरा केला जातो मानवाधिकार दिवस

News Desk

रोड शोदरम्यान पुन्हा एकदा केजरीवाल यांच्या श्रीमुखात भडकावली

News Desk