HW News Marathi
देश / विदेश

Republic Day | ‘एक झेंडा हिरवळीचा’ शालेय विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

मुंबई | प्रजासत्ताक दिन असो वा स्वातंत्र्य दिन, आबालवृद्धांना देशाचा राष्ट्रध्वज-तिरंगा हवाच असतो. पण दुस-या दिवशीच हा तिरंगा रस्त्याच्या एका कडेला पडलेला असतो. अनावधानाने होणारा हा राष्ट्रध्वजाचा अपमानच आहे. मात्र, हे कुठे तरी थांबायला हवे म्हणूनच सायनच्या शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी एक शक्कल लढवली आणि त्यातून निर्माण झाला- इकोफ्रेंडली तिरंगा. रविवारी (१३ जानेवारी)सायंकाळी शाळेत आयोजित करण्यात आलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्यात हा इकोफ्रेंडली तिरंगा सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता.

डी. एस. हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेचे संजय खंदारे यांच्या कल्पनेतून ‘एक झेंडा हिरवळीचा’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे. याविषयी अधिक माहिती देताना संजय खंदारे म्हणाले, “हा तिरंगा संपूर्णपणे इकोफ्रेंडली कागदापासून बनवण्यात आलेला आहे. तिरंगा हातात पकडण्यासाठी लाकडाच्या काडीऐवजी कागदी स्ट्राॅचा वापर केला असून या पोकळ स्ट्राॅमध्ये वांगे, भेंडी यांसारख्या भाज्या किंवा गुलाब, सूर्यफूल, मोगरा यांसारख्या फुलांच्या बिया व खत टाकलेले आहे. त्यामुळे हा झेंडा कुंडीत लावल्यास त्यातून झाड उगवेल. त्यामुळे, तिरंग्याचा होणारा अपमान आपोआपच रोखला जाईल.”

“शाळेतील विद्यार्थ्यांना हा इकोफ्रेंडली तिरंगा बनवण्याचे प्रशिक्षण दिले जात असून हस्तकलेच्या वर्गात विद्यार्थी हा झेंडा बनवतील. त्यानंतर इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना या इकोफ्रेंडली तिरंग्याच्या विक्रीचे महत्व समजावून सांगण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येणार असून खाजगी तसेच काॅर्पोरेट कंपन्या, गृहनिर्माण संस्था, शैक्षणिक संस्थांमध्ये हे विद्यार्थीच इकोफ्रेंडली तिरंग्याचं सेल्स आणि मार्केटिंग सांभाळतील”, अशी माहिती शिव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी दिली आहे. येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारीला २० हजार इकोफ्रेंडली तिरंग्यांच्या विक्रीचे उद्दीष्ट्य असल्याचेही राजेंद्र प्रधान यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे, या इकोफ्रेंडली तिरंग्याच्या संकल्पनेचे जागतिक पेटंट घेण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत, असेही संजय खंदारे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

मराठी शाळांना आज निधीची गरज आहे. लोकोपयोगी उपक्रम राबवून शाळेसाठी निधीसंकलन कसं करता येईल, हा विचार करत असताना ‘एक झेंडा हिरवळीचा’ या उपक्रमाचा जन्म झाला. या उपक्रमातून होणारा नफा आम्ही शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी आमचं योगदान म्हणून देणार आहोत.

– संजय खंदारे, माजी विद्यार्थी

…….

शाळेचे अनेक माजी विद्यार्थी निधी उभारणीसाठी शाळेला मदत करत आहेत. अनेक नवनव्या कल्पना राबवण्यासाठी ते पुढाकार घेत आहेत. कल्पक उपक्रम राबवण्यासाठी माजी विद्यार्थी त्यांची नोकरी-धंदा सांभाळून शाळेला वेळ देतायत, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

– – राजेंद्र प्रधान, अध्यक्ष, डी. एस. हायस्कूल

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमरनाथ यात्रेकरुंचे पार्थिव सुरतला रवाना

News Desk

देशात मेल, एक्स्प्रेस, लोकल सेवा ३० सप्टेंबरपर्यंत बंदच

News Desk

“लोकांच्या चिता जळल्या म्हणून 100 कोटी लशीचा उत्सव का”? नाना पटोले

News Desk