HW News Marathi
देश / विदेश

Republic Day | पहिले चार प्रजासत्ताक दिन इथे साजरे झाले

नवी दिल्ली | भारतात पहिला प्रजासत्ताक दिन १९५० मध्ये साजरा करण्यात आला होता. २६ जानेवारी १९५० ला भारतीय संविधान आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या रूपाने भारताला पहिले राष्ट्रपती लाभले. हा प्रजासत्ताक दिन साजरा करत पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी इरविन मैदानात भारतीय ध्वज फडकवला होता. इतिहासातील नोंदीनुसार, २६ जानेवारी १९५० ला सकाळी १०.१८ मिनिटांनी भारताचं संविधान लागू करण्यात आलं होतं. त्यानंतर काही मिनिटांनी १०.२४ वाजता डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती.

१९५० पासूनच पाहुणे बोलवण्याची प्रथा

१९५० पासून प्रजासत्ताक दिनाला इतर देशातील पाहुणे बोलवण्यास सुरूवात झाली होती. पहिल्या प्रजासत्ताक दिवसावर इंडोनेशियाचे तत्कालीन राष्ट्रपती सुकर्णो हे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते.

वेगवेगळ्या जागेवर साजरा केला जात होता प्रजासत्ताक दिन

१९५० आणि १९५४ दरम्यान भारतात प्रजासत्ताक दोन समारोह साजरा करण्यासाठी एक निश्चित स्थळ नव्हते. सुरूवातीला हा समारोह लाल किल्ला, नॅशनल स्टेडियम, किंग्सवे कॅम्प आणि नंतर रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आला होता. १९५५ मध्ये पहिल्यांदा राजपथाची प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी निश्चिती करण्यात आली. या दिवशी भारतीय सैन्याद्वारे परेड केली गेली होती आणि तोफांची सलामी देण्यात आली होती. परेडमध्ये सशस्त्र सेनेच्या तिन्ही दलांनी सहभाग घेतला होता. आजही प्रजासत्ताक दिन राजपथावरच साजरा केला जातो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चीनची घाबरगुंटी; डोकलाममधून माघार

News Desk

शरद पवारांसोबतच्या बैठकीत नक्की काय चर्चा झाली?, प्रशांत किशोरांचा खुलासा

News Desk

“पाच दिवसात ३.२० पैशांनी पेट्रोल-डिझेलची दरवाढ; मोदीजी कुठे आहेत अच्छे दिन?”

News Desk