HW News Marathi
मनोरंजन

या दिवाळीत करून पहा गव्हाची शंकरपाळी

अनेक वर्षांपासून दिवाळीमध्ये मैद्याच्या पिठाची शंकरपाळी प्रत्येकाच्या घरात बनते, मैदा हा पचण्यासाठी थोडा जड असतो. आता त्याला पर्याय म्हणून गव्हाच्या पिठाची शंकरपाळी (गव्हाची शंकरपाळी) आपण बनवू शकतो.

साहित्य :-

गव्हाचे २ कप

साखर ३/४ कप

दूध ३/४ कप

गरम तूप ३ चमचे

वेलची पावडर १/२ चमचे

एक चिमूटभर मीठ

तळण्यासाठी तेल

कृती :-

  • एका वाडग्यात गव्हाचे पीठ घ्या, त्यामध्ये वेलची पावडर आणि चवीपुरते मीठ घालून एकजीव करून घ्या,
  • त्यांनतर तूप गरम करून, त्या पिठात तुपाचं मोहन घाला,
  • दूध गरम करून त्यात साखर घाला,साखर वितळेपर्यंत दूध हलवा
  • ते मिश्रण गरजेनुसार पिठात घाला, पीठ मऊवार मळून घ्या,
  • ३० मिनिटांसाठी मळलेले पीठ बाजूला ठेवावे,
  • पिठाचे सारखे गोळे करा, पिठाच्या पोळ्या लाटून , चिरणाच्या साहाय्याने काप काढावेत.
  • बाजूला तेल तापवायला ठेवावे, तेल गरम झाल्यावर शंकपाळी तळून घ्याव्या
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#IndianNavyDay जाणून घ्या कसे आहे भारतीय नौदल

News Desk

मोरुची मावशीचे दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे निधन

swarit

डॉ. अरुणा ढेरे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

swarit