HW News Marathi
मनोरंजन

मोडी लिपीतून दिवाळीच्या शुभेच्छा देणाऱ्या पणत्या

मुंबई | दिवाळीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पणत्या बाजारात दाखल झाल्या आहेत. बाजारात अनेक प्रकारच्या पणत्या पाहायला मिळतात. अश्याप्रकारे पणत्यांवर मोडी लिपीतून शुभेच्छा देणाऱ्या पणत्या देखील तुम्हाला मिळू शकतात. मोडी लिपी वाचविण्याचा हा प्रयत्न केला आहे. साताऱ्यातील चरिता कुलकर्णी फडके यांनी केला आहे.

गेल्या ३ वर्षांपासून मोडी लिपीतून शुभेच्छा देणाऱ्या पणत्या चरिता कुलकर्णी फडके वितरीत करीत आहेत. या माध्यमातून मोडी लिपी विषयी जनजागृकता निर्माण होऊन मोडी लिपी विषयी लोकांमध्ये चर्चा होऊन ती जगवण्याचा व आपली ऐतिहासिक लिपी टिकवण्यासाठी कल वाढत आहे. यंदाच्या दिवळीतही सदर पणत्या त्यांनी उपलब्ध केल्या असून ना नफा ना तोटा या तत्वावर त्या अवघ्या ३० रुपयात उपलब्ध करून दिल्या आहेत.

नवीन पिढी मध्ये आपल्या मराठेशाहीच्या पत्र व्यवहारात आणि राज्यकारभारात आढळणारी मोडी लिपी जिवंत राहावी व ती शिकण्याचा व पर्यायाने जगवण्याचा कल वाढीस लागावा यासाठी चरिता प्रयत्नशील आहेत. दिवाळीच्या शुभेच्छा मोडी लिपीच्या पणत्यांच्या माध्यमातून देऊन हा ऐतिहासिक वारसा आपण साऱ्यांनी या पणत्या विकत घेऊन पुढे नेऊया.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अलाहाबादचे नाव बदलून ‘प्रयागराज’ होणार ?

News Desk

“बेबिन्का” गोवा स्पेशल मिठाई

News Desk

आश्विन अमावस्येलाच का होते लक्ष्मीपूजन !

News Desk