HW News Marathi
संपादकीय

निकाह हलाला आणि बहुपत्नीत्व मुस्लिम समाजातील कुप्रथा ?

भारतात विविध जात धर्माचे लोक रहातात. प्रत्येक धर्माच्या काही रुढी आणि परंपरा आहेत. दिवसेंदिवस होत असलेल्या प्रगतीमुळे समाजात असललेल्या अनिष्ट रुढी परंपरांमध्ये बदल होत आहेत. पुर्वीच्या काळी बाल विवाह स-हास व्हायचे , पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला सती जावे लागे. बालजरठ विवाह यांसारख्या अनेक रुढी प्रथा बदलत्या काळानुसार समाजाने बंद केल्या. मात्र आजही काही समुदायांमध्ये धर्माने घालून दिलेल्या नियमांचा वापर महिलांचे शोषण करण्यासाठी होत असलेला दिसतो.

प्रामुख्याने अनिष्ट रुढी परंपरा मुस्लिम समाजात सर्वाधिक पहायला मिळतात. देश प्रगती पथावर असला तरीही हलाला आणि बहुपत्नीत्व प्रथा ही मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणात पहायला मिळते. तिहेरी तलाक प्रथा बंद करण्यासाठी मुस्लीम महिलांना रस्त्यावर उतरावे लागते यासारखे दुसरे दुर्दैव ते काय ?

हलाला म्हणजे काय ?

घटस्फोट घेतल्यानंतर देखील विभक्त झालेल्या जोडप्याला पुन्हा एकदा एकत्र येण्याची इच्छा असेल तर ते एकत्र येऊ शकतात. त्यांना पुनर्विवाह करण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. अर्थातच एकत्र येण्यासाठी त्यांची परस्पर सहमती आवश्यक आहे. त्यांना एकत्र येण्यापासून कोणीही थांबवू नये, अशी तरतूद इस्लाममध्ये करण्यात आलेली आहे. येथे साहजिकच प्रश्न निर्माण होतो कि जर असे असेल तर हलाला काय आहे?

समाजात हलालाबद्दल जे काही बोलले जाते ते काय आहे? हलाला ही एक भारतीय उपखंडातील म्हणजे भारत, पाक आणि बांग्लादेश या देशातील मुस्लिम समाजातील एक कुप्रथा आहे. परंतु ही प्रथा सर्वमान्य नसून अगदीच दुर्मिळ अशी कुप्रथा आहे. म्हणजे कोट्यवधीतून कदाचित एखादा यावर आचरण करीत असेल, ते ही लपून छपून. तुम्ही एखाद्या मुस्लीम स्त्री-पुरुषाला तुझा किंवा तुझ्या जोडीदाराचा हलाला झाला आहे का? असा प्रश्न केल्यास ती किंवा तो तुम्हाला उत्तर देणार नाही. त्यामुळे मुस्लीम समाजामध्ये या कुप्रथेकडे पाहण्याचा दृष्टीकोन प्रचंड तिरस्कृत आहे. परंतु तरी सुद्धा ही प्रथा आजही सुरु आहे.

पती-पत्नीमध्ये घटस्फोट झाला असेल आणि चूक झाल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली असेल तर पती पत्नीशी संबंध ठेवू शकतो. त्यासाठी महिलेला घटस्फोट हलालाचे पालन करावे लागते. म्हणजे तिला घटस्फोटित व्यक्तीशी लग्न करावे लागते. त्याच्याशी संबंध ठेवल्यानंतर त्याला घटस्फोट देऊन पहिल्या पतीसोबत घटस्फोट करावा लागतो, त्याला निकाह हलाला म्हणतात. वारंवार घटस्फोट घेण्याचे प्रकार घडू नयेत यासाठी ही प्रथा प्रचलित झाल्याचे सांगण्यात येते.

बहुपत्नीत्व म्हणजे काय?

बहुपत्नीत्व ही एक इस्लामिक रूढी आहे. या रूढीनुसार पुरुषांना चार विवाह करण्याची परवानगी देण्यात आली आहे. विधवा आणि निराधार महिलेला आधार देणे हा त्यामागचा मुख्य हेतू होता. परंतु दिवसेंदीवस याचा वापर चुकाचा झाल्यामुळे महिलांच्या भावनांना बगल देऊन अनेकदा बहुपत्नीत्व प्रथेच्या नावावर अनेक विवाह केले जातात.

प्रथा आणि रुढी परंपरेच्या बडग्याखाली महिलांची होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी बहुपत्नीत्व ही प्रथा बंद होणे काळाची गरज आहे.

मुस्लिम धर्म जरी बहुपत्नीत्वाला परवानगी देत असला तरी त्याला प्रोत्साहन देत नाही असे धर्मगुरु सांगतात. मात्र वस्तुस्थिती निराळीच आहे असे अनेक प्रकरणांमध्ये समोर आले आहे.

तिहेरी तलाक विरोधात सुप्रिम कोर्टाने निकाल दिला असला तरी हे प्रकार सुरुच आहेत. मुंबईतील डोंगरी विभागातील एका मुस्लिम महिलेने मुंबई उच्च न्यायालयात आपल्या पती विरोधात याचिका दाखल केलेली आहे. याचिका कर्त्या महिलेच्या म्हणण्यानुसार बहुपत्नीत्व आणि निकाह हलालावर संपुर्णतः बंदी आणण्याची विनंती कोर्टाला केली आहे.

महिलेच्या म्हणण्यानुसार जून २०१८ मध्ये तलाक चे प्रमाणपत्र पतीने दिले आणि त्यानंतर आपला तलाक झाला असल्याचे सदर महिलेच्या लक्षात आहे. यापुर्वी तलाक होणार असल्याची पुर्व कल्पना नसल्याचे मत या महिलेने मांडले. यापुढे सास-याशी निकाह हलाला कर असे पतीकडून सांगण्यात आले आहे. ही आणि अशी अनेक उदाहरणे नेहमीच समोर येतात. कायदेशीर रित्या आगामी काळात या प्रकारांवर बंदी येईलच मात्र समाजाने पुढाकार घेतला तर या प्रथा समूळ नष्ट होतील यात शंका नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिक्षण खात्याला संविधानाचा विसर पडलाय का ?

swarit

ठाकरे बंधू एकत्र आले तर…

swarit

मराठा मोर्चाचे आंदोलन भरकटले

swarit