HW News Marathi
संपादकीय

गळाभेटीची रणनीती

पूनम कुलकर्णी | लोकसभेत टिडीपीने मांडलेल्या अविश्वास ठरावावर शुक्रवारी जोरदार चर्चा झाली. यामध्ये सर्वात जास्त गाजले ते कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे भाषण आणि मोदींची त्यांनी घेतलेली गळाभेट. राहुल यांनी भाषणात मुद्देसुद पद्धतीने राफेल डील, डोकलाम, शेतकरी प्रश्न, रोजगार, जीएसटी, नोटबंदी यांसारखे मुद्दे मांडले. मात्र ख-या अर्थाने लक्ष वेधले ते मोदींच्या गळाभेटीने. या गळाभेटीनंतर अनेकांनी राहुल यांच्यावर टिका केली तर अनेकांनी त्यांचे कौतुक केले. टिकेचे मुख्य कारण म्हणजे आपले सहकारी आणि जवळचे असलेले ज्योतिरादित्य सिंधीया यांना मारलेला डोळा. परंतु अनेक स्व घोषित तज्ञानी राहुल यांच्या चेह-यावरील अविर्भावाचे विश्लेषण करताना ही राहुल गांधी यांची पुर्व नियोजित खेळी असल्याचे म्हटले तर गांधी यांच्या या खेळीला मोदींनी बालिशपणा म्हणून संबोधले.

खरे तर या गळाभेटीचे चिंतन केले तर राहुल नाही तर मोदी बालिश ठरले. जर राहुल आणि मोदी यांची ही गळाभेट पुर्वनियोजित असेल तर राहुल गांधीनी नरेंद्र मोदींना त्यांच्याच डावात पराजित केले. जागतिक पातळीवर मोदी नेहमीच प्रत्येक बड्या नेत्यांची गळाभेट घेतात. त्यात त्या नेत्यांची इच्छा असते किंवा नसते हा प्रश्न निराळाचं. पण राहुल गांधी कधी आपली संसदेत गळाभेट घेतली असा विचारसुद्धा न केलेल्या मोदींना यावर काय प्रतिक्रीया द्यावी हेच कळले नाही. त्यामुळे ऐनवेळी उडालेला गोंधळा हा मोदींच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होता. नंतर राहुल गांधींना परत बोलवून ती वेळ सावरायचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत जे घडायचे ते घडून गेले होते.

ही गळाभेट जर का उस्फुर्त प्रतिक्रीया असेल तर राहुल गांधीमध्ये एक नेता म्हणून नवनिर्माण होतयं असे म्हणायला हरकत नाही. कारण राहुल गांधी यांना उत्तर देताना मोदी यांनी ९० मिनिटांच्या भाषणात त्यांनी मांडलेल्या मुद्यांना प्रत्युत्तर दिले परंतु सर्वांचे लक्ष वेधलेल्या राहुल गांधी यांच्या मिठीला मात्र बालिशपणा म्हणून सबोधून मोदींनी स्वताच्या विचारांचा बालिशपणा दाखवला. खरंतर अविश्वासाचा ठराव टिडीपीने संसदेत मांडला होता. मात्र मोदींच्या भाषणात सगळ्यात जास्त वेळ राहुल गांधी यांची खिल्ली उडविण्यात गेला. मात्र गळाभेटी आधिच राहुल गांधी म्हणाले होते, आपण माझी कितीही खिल्ली उडवा, मला पप्पू म्हणा मात्र आम्ही कॉंग्रेसची संस्कृती विसरणार नाही आम्ही आपला आदरचं करु. त्यामुळे या वक्तव्यापुढे मोदींचा प्रयत्न हा बालिशच ठरला.

परंतु इतिहासात पाहिले तर राहुल गांधी प्रचार सभांच्या भाषणात शब्दांमध्ये गल्लत करायचे. लोकांच्या घोषणांमध्ये गोंधळून जायचे. यामुळे ट्रोल आर्मी मार्फत टिकेचे धनी व्हायचे. मात्र शुक्रवारी संसदेत केलेल्या भाषणामुळे एक नवीन राहुल गांधी पहायला मिळाले. त्यांच्या भाषणाचा आलेख वाढत होता. त्यांच्या भाषणातला आत्मविश्वास दिसत होता. सत्ताधा-यांच्या गोंधळामध्ये सुद्धा राहुल गांधी आपले मत ठामपणे मांडत होते. या उलट नरेंद्र मोदी यांच्या भाषणामध्ये तेच नेहमीचे मुद्दे आणि आकडेवारी होती. तेच तेच मुद्दे आणि तीच आकडे होती. नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा स्वर अहमपणा तेच तेच मुद्दे आणि आकडेवारी असा संमिश्र प्रकारचा होता जो नेहमीच प्रचार सभांमध्ये पहायला मिळतो. त्यामुळे संसदेतील या सगळ्या अविश्वास ठराव प्रकरणात राहुल गांधी यांचे भाषण उजवे ठरले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरएसएस भाजपच्या विचारधारेपासून अलिप्त रहात आहे का ?

swarit

भावी मुख्यमंत्री शिवसेनेचाच ?

swarit

… मृत्यूनंतरही ती न्यायाच्या प्रतिक्षेत

swarit