नवी दिल्ली | मोदी सरकार विरोधात आज संसदेत अविश्वास ठरावावर सर्व पक्षांचे सदस्य आपली बाजू मांडणार आहेत. प्रत्येक पक्षाला आपला आपली बाजू मांडण्यासाठी ठराविक वेळ देण्यात आला आहे. त्यामध्ये कॉंग्रेसला ३८ मिनिटे इतका वेळ देण्यात आला होता. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावेळी संसदेत मोदी सरकारच्या कामाचा पाढा वाचला. मोदींसह अनेकांवर राहुल यांनी सडकून टिका केली.
राहुल गांधी भाषणा दरम्यान मध्येच थांबून मोदींकडे गेले. यावेळी राहुल यांनी मोदींशी हास्तदोलन करून गळाभेट घेतली. राहुल गांधी यांच्या ‘गळाभेट’ने संपूर्ण संसद सदस्यांना अवाक केले. या घटनेने स्वत: मोदी देखील आर्श्चय चकीत झाले. दस्तुरखुद्द मोदींनी हसून राहुलच्या या गळाभेटीचे स्वागत केले. यानंतर राहुल गांधींनी पुन्हा आपले आसन ग्रहण केल्यानंतर रक्षा मंत्री निर्मला सीतारमण यांच्या भाषणाला सुरुवात झाली.
#WATCH Rahul Gandhi walked up to PM Narendra Modi in Lok Sabha and gave him a hug, earlier today #NoConfidenceMotion pic.twitter.com/fTgyjE2LTt
— ANI (@ANI) July 20, 2018
सीतारमण यांच्यावर राहुल यांनी केलेल्या आरोपांचे त्या खंडण करत होत्या. तेवढ्यात राहुल गांधी यांच्याकडे कॅमेरा नेण्यात आला. तेव्हाच राहुल यांनी डोळा मारला. राहुल यांचा हा खोडसळपणा कॅमेऱ्यात कैद झाला. यात राहुल गांधी डोळा मारून हसले….सर्वांचे लक्ष्य राहुल यांनी मोदींना मारलेल्या गळाभेटीकडे होते. परंतु राहुल यांच्या गळाभेटीच्या अवाक करणाऱ्या प्रसंगानंतर त्यांनी नक्की डोळा कोणाला मारला. याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. म्हणून सर्वजण त्यांच्यावर टीका करत होते.
परंतु राहुल गांधी यांनी कोणाला डोळा मारला हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या….
#WATCH Rahul Gandhi winked after hugging PM Narendra Modi in Lok Sabha earlier today #NoConfidenceMotion pic.twitter.com/206d6avU07
— ANI (@ANI) July 20, 2018
यावेळी राहुल गांधी यांनी काँग्रेस खासदार आणि त्यांचे खास मित्र ज्योतिरादित्य सिंधिया यांना डोळा मारून हसले. राहुल यांनी मोदींची गळाभेटी घेतली तर, दुसऱ्या बाजूला डोळा मारला. म्हणजे गळाभेट हे जणू एक राजकीय नाट्य असल्याचे चित्र दिसून आले. राहुल मोदी गळाभेटीमुळे सोशल मिडीयावर वेगवेळ्या कॉमेंटचा पाऊस पडतोय. राहुल आणि मोदी यांच्या गळाभेटी ने सध्या सोशल मीडीयावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. त्याचबरोबर दोघांच्या गळाभेटीवर देखील काही लोकांनी राजकारण करायला सुरुवात केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.