HW News Marathi
संपादकीय

विरोधकांनी प्रभावी नेतृत्व दिल्यास भारत सत्ता बदलास इच्छूक | HW न्यूज सर्वेक्षण

विधानसभा, लोकसभा या आगामी निवडणुकांचे बिगुल 2019 च्या जानेवारी नंतर कधीही वाजण्याची शक्यता आहे. या निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक राहील्यामुळे एचडब्ल्यू न्यूज नेटवर्कने जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणानुसार असे निदर्शनास आले आहे की, विरोधकांना येत्या काळात अवघ्या काही महिन्यात नरेंद्र मोदी यांच्या तोडीस तोड देणारा पतंप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करणे गरजेचे आहे.

पूनम कुलकर्णी | 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजयला सुरुवात झाली आहे. विविध राजकीय गठबंधनांबद्दल आणि सरकारच्या भविष्याबद्दल जनतेचा सुर जाणून घेण्याचा प्रयत्न एचडब्लू न्यूज नेटवर्कने केला आहे. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांना साथ द्यायची किंवा नाही असा संभ्रम जनतेमध्ये असल्यामुळे आगामी निवडणुकीचे भवितव्य काय हे पहाण्यासाठी एचडब्ल्यू न्यूज नेटवर्कने एक सर्वे करण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत आम्ही जनमत जाणून घेतले आहे.

या सर्वेक्षणाला “पीपल्स बिलीफ” असे नाव देण्यात आले होते. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून जनतेचा कल व त्याचे मूल्यांकन करण्यासाठी वर्तणुकीची अभ्यास पद्धत वापरण्यात आली आहे. हे सर्वेक्षण 6 महानगरांमध्ये, 14 शहरांमध्ये, 300 गावांमध्ये आणि सुमारे 7000 वेगवेगळ्या विषयांतील अभ्यासकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सर्वेक्षणाच्या या निकालामुळे काही मनोरंजक निष्कर्ष समोर आले आहेत. हे निष्कर्ष आगामी निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत ‘मोदी लाटे’मुळे भाजपला घवघवीत यश मिळाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदासाठी असलेला लोकप्रिय असा चेहरा असल्यामुळे तसेच जनतेला कॉंग्रेस व्यतिरीक्त इतर राजकीय पक्षाला संधी देण्याची गरज वाटल्यामुळे 2014 ला भाजप पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्यामुळे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पतंप्रधान झाले होते. तसेच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्तवाखाली महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यांमधील विधानसभेमध्ये भाजपची विजयी पताका फडकली होती.

परंतु, सध्या एचडब्ल्यू न्यूज नेटवर्कने केलेल्या सर्वेमध्ये असे आढळून आले की, गेल्या चार वर्षांत मोदींच्या लोकप्रियतचे लाट ओसरली आहे. यापेक्षा आणखी महत्वाची बाब म्हणजे 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत मोदी लाट ही निम्म्याहून कमी झाल्याचे चित्र सध्या पहायला दिसत आहे. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपला मोठा धक्का बसू शकतो. सर्वेक्षणातील एकूण अभ्यासकांपैकी 82 टक्के लोकांनी म्हटले आहे की मोदींमुळे 2014 च्या निवडणुकीत भाजपला मतदान केले असले तरी, त्यापैकी फक्त 41 टक्के लोक 2019 मध्ये पुन्हा एकदा मोदींना मत देण्यास तयार आहेत. तर 59% लोकांनी मोदींना आगामी लोकसभा निवडणुकीत मत देण्यास नकार दिला आहे.

या सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार मोदींची लोकप्रियता अर्ध्याहून कमी झाली आहे. लोकप्रियता कमी झाल्यामुळे निवडणूक निकालांवर देखील याचा परिणाम होईल. 2014 च्या निवडणुकीत भाजपला 282 जागा मिळल्या होत्या तर आमच्या सर्वेक्षणानुसार 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 203 जागा मिळण्याची शक्यता आहे.

  • भाजपला मोदींना पर्यायी चेह-याची गरज

विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांची लोकप्रियता कमी झाली असली, तरी भाजपला अजूनही आशा आहे. 60 टक्के लोकांना अजूनही असे वाटते की, भाजप सरकारने 2019 मध्ये नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून भाजपमधील इतर नेत्यांपैकी पंतप्रधान पदासाठी उमेदवार द्यावा. मोदींना पर्याय म्हणून इतरांपैकी कुणाला संधी मिळाल्यास जनता पुन्हा भाजपला साथ देईल का ? असा प्रश्न सर्वेक्षणा दरम्यान विचारले नागरीकांना विचारला असता, सर्वाधिक लोकांनी सकारात्मक उत्तरे दिल्याचे पहायला मिळाले. याचा अर्थ असा होतो की लोक भाजपमध्ये मोदींना पर्याय म्हणून नवीन व्यक्तीच्या शोधार्थ आहेत. भाजपच्या नेत्यांपैकी जनतेचा कल नितिन गडकरी यांच्याकडे 55 टक्के,तर सुषमा स्वराज यांच्याकडे 40 टक्के असून राजनाथसिंह, लालकृष्ण अडवाणी 4% आणि 1% अशा अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत.

एचडब्ल्यू न्यूज नेटवर्कच्या सर्वेक्षणात नितिन गडकरी यांना 55 टक्के लोकांनी कौल दिला आहे तर सुषमा स्वराज यांना 40 टक्के लोकांनी कौल दिला असल्यामुळे भाजपमध्ये या दोन व्यक्ती मोदींना पर्याय म्हणून पंतप्रधान पदासाठी उत्तम पर्याय असू शकतात. हे दोघे ही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बनर्जी हे जनतेच्या जास्त पसंदीस उतरल्याचे सर्वेतून समोर आले आहे.

  • भाजपचा मतदार विरोधकांना मत द्यायला सज्ज, पण…

सर्वेक्षणातून असे असे निर्शनास आले की विरोधी पक्षांनी स्पष्ट नेतृत्व द्यावे. कारण आगामी निवडणुकीत भाजपचे 9% समर्थक हे विरोधी पक्षांना मतदान करण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु विरोधी पक्षाकडून अद्याप पंतप्रधान पदासाठी ठोस असा उमेदवार ठरलेला नाही. कारण पंतप्रधान पदाचा उमेदवार निश्चित केला तर विरोधी पक्षात मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण काँग्रेसने सूचित केल्याप्रमाणे पंतप्रधानपदाचा उमेदवार पक्षातल्याच नेत्यांपैकी असणार आहे. तर दुसरीकडे अखिलेश यादव,मायावती आणि ममता बॅनर्जी यांच्यात मतभेद आहेत.

  • अमित शाह, योगी आदित्यनाथ हे पंतप्रधान पदाचे अयोग्य उमेदवार

नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या तुलनेत या सर्वेक्षणाच्या माध्यमातून तुर्तास कुणीही सर्वोत्तम पर्याय म्हणून निवडले गेले नाहीत. परंतु सर्वेतून प्राप्त झालेल्या माहितीनुसार अनेक नागरीकांच्या मते लालकृष्ण अडवाणी हे पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार आहेत. अडवाणी यांच्या वयाचा आणि अनुभवाचा विचार करुन त्यांना केवळ 4% लोकांनी पसंदी दिली आहे.

तर योगी आदित्यनाथ केवळ स्टार प्रचारकांच्या भूमिकेस अनुकूल आहेत. या सर्वेक्षणाचे मत होते की शाह किंवा योगी राष्ट्रीय नेते बनण्यास अद्याप सक्षम नाहीत. भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा ही जनतेकडून पाठिंबा न मिळाल्यामुळे पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून बाहेर जनतेच्या मतानुसार बाहेरच आहेत.

  • काँग्रेसकडे पंतप्रधान पदासाठी सशक्त चेहरा हवा

काँग्रेस देशव्यापी विरोधी गठबंधन बनविण्याचा प्रयत्न करत आहे. तर सर्वेक्षणानुसार 40% नागरीकांचा कल विरोधी पक्षांना मतदान करण्याकडे असून, त्यापैकी फक्त 16 टक्के काँग्रेसच्या बाजूने मतदान करतील. तर 24% इतर पक्षांना मतदान करतील. सर्वेक्षणात असे आढळून आले की काँग्रेसमध्ये स्पष्ट आणि सशक्त नेतृत्व नाही त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी कॉंग्रेसचा कस पणाला लागणार आहे.

विरोधी गटात पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधी सर्वात जास्त पसंती आहे. राहुल गांधी यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पवार हे 2019 पर्यंत पंतप्रधान होऊ शकतील असा 6 टक्के जनतेचा कौल असून 3 टक्के लोकांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पसंदी दिली आहे. भाजपाने राहुल गांधी यांच्यावर सतत सोशल मिडीयावरु सतत टिका केल्यामुळे (ट्रोलिंग) 16 टक्के लोकांचा पाठींबा सिंपती म्हणून मिळाला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

एचडब्ल्यू न्यूज नेटवर्कच्या सर्वेक्षणातून निघालेल्या निष्कर्षानुसार, लोकप्रियतेत घसरण झाली असली तरी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर उमेदवारांपेक्षा आजही पुढे आहेत. तर भाजपाकडून नरेंद्र मोदी यांना पर्यायी उमेदवार दिला तर भाजपाला एनडीएचे समर्थन मिळेल. दुसरीकडे, विरोधकांना मोदींना पराभूत करण्याची इच्छा आहे. तर त्यांना तीन महिन्यांत स्पष्ट नेतृत्व देण्याची गरजचे आहे. जेनेकरुन मोदींचा सहज पराभव करता येऊ शकेल. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी विरोधी पक्षाने लोकप्रिय नेतृत्व निवडल्यास भारतात 2019 मध्ये राजकीय वर्तुळात निश्चित असे चांगले बदल होतील यात तिळमात्र शंका नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरक्षण हक्क की विषेश संधी ?

swarit

भावी मुख्यमंत्री शिवसेनेचाच ?

swarit

दुष्काळापेक्षा भ्रष्टाचार ही शेतक-यांची खरी समस्या

swarit