HW News Marathi
संपादकीय

भावी मुख्यमंत्री शिवसेनेचाच ?

पूनम कुलकर्णी | शिवसेनेचा वर्धापनदिन सोहळा मंगळवारी गोरेगावच्या नेस्को मैदान येथे पार पडला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी आगामी काळात महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असा निर्धार व्यक्त केला. उद्धव यांच्या या वक्तव्यामुळे केवळ भाजपचं नव्हे तर महाराष्ट्रातील इतर पक्षांनाही शिवसेने बरोबर युती करण्याचे खुले आवाहन मिळाले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

शिवसेने स्वबळावर लढू अशी एकूणचं भूमिका असलेल्या उद्धव यांनी अप्रत्यक्ष भाजपासह सर्वच पक्षांना युतीचा इशारा दिलाय. यापूर्वी युती केल्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री आणि सेनेचे इतर मंत्री अशी अवस्था महाराष्ट्रात आहे. भाजपाचा मुख्यमंत्री असल्यामुळे सध्या सेनेला अनेक निर्णयामध्ये केवळ नाममात्र ग्राह्य धरले जाते. या समीकरणाला बगल देऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री आणण्यासाठी उद्धव धडपडताना पहायला मिळत आहेत.

शिवसेनेने आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाशी युती करावी म्हणून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेची मनधरनी करण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु दुस-याच दिवशी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपण स्वबळावरचं लढणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे आगामी निवडणुकीत सेना भाजप युती होणार का हे तर येणारा काळाच ठरवेल.

परंतु उद्धव यांच्या भाषणानंतर कुणीही युती केली तरी मुख्यमंत्री सेनेचाच होणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सध्या मित्रपक्ष असलेल्या भाजपाला उद्धव यांचा हा इशारा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेची एकहाती सत्ता जरी येऊ शकली नाही तरीही भाजप मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी शिवसेनेला इतर पक्ष बाहेरुन पाठींबा दर्शवतील यात तिळमात्र शंका नाही. येत्या काळात शिवसेना पक्ष प्रमुखांची युतीची ऑफर कोणता पक्ष स्वीकारणार हे पहाण औत्सुक्याचे ठरणार आहे.

आमची विचारधाराच वेगळी

वर्धापन दिनी केलेल्या भाषणात शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यासंदर्भात एचडब्लू मराठीशी बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, प्रत्येक पक्षाला स्वप्न बघण्याचे अधिकार आहेत. प्रत्येक पक्ष वाढीसाठी आपापले प्रयत्न करत असतो. परंतु महाराष्ट्रात सत्ता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रवादी कधीही शिवसेनेशी युती करणार नाही कारण आमचे वैचारीक मतभेद आहेत आमची विचारधारा शिवसेनेपेक्षा वेगळी आहे. प्रत्येक पक्षाची विचारधार ही कुठेतरी रास्त असते त्यामुळे महाराष्ट्र भाजप मुक्त व्हावा ही आमची भुमिका नाही. परंतु येत्या काळात आम्ही आघाडी करुन लढणार आहोत. जनता परीवर्तन करण्याच्या भूमिकेत आहे त्यामुळे समविचारी पक्षांना एकत्र घेऊन लढल्यामुळे जनता आम्हाला संधी देईल आणि आमची सत्ता येईल यात काहीही शंका नाही असेही नवाब मलिक एचडब्लू मराठीशी बोलताना म्हणालेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आशियाचा नोबेल ‘मॅगसेसे पुरस्कार’

swarit

…म्हणून शेतक-यांना दूध रस्त्यावर ओतावे लागते

swarit

एक ठिणगी, राज्यभर होरपळ

swarit