मुंबई | भावी काळात महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री करणार असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोहळ्यात केला. आज शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात ते बोलत होते. जे आव्हान देण्यासाठी समोर आहेत, त्यांच्या छाताडावर शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवून दाखवेन, असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणालेत.
It took you 3.5 years & sacrifice of around 600 soldiers to realise that you should take back your support in #JammuAndKashmir. When you know how that govt functions, how could you even support them for so long: Uddhav Thackeray, Shiv Sena on BJP calling off alliance with PDP pic.twitter.com/V7XxjuT6oB
— ANI (@ANI) June 19, 2018
विधानसभा तसेच लोकसभेत भगवा फडकविण्याआधी जनतेच्या मनात भगवा रुजवा, असे आवाहनही उद्धव ठाकरें यांनी यावेळी शिवसैनिकांना केले. उद्धव ठाकरे यांनी जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरुनही भाजपवर जोरदार टिका केली. सीमेवर अनेक सैनिकांचे बळी जावे लागले, तेव्हा भाजपला उपरती झाली का? दहशतवादाला रंग नसतो, तर मग रमजानला शस्त्रसंधी का, असा सवालही उद्धव यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला. तसेच पीडीपीशी युती तोडल्यामुळे ठाकरे यांनी भाजपा सरकारचे अभिनंदन देखील केले.
There were reports that Pawar Ji offered us to join United opposition. It shows everyone is realising how strong we've become. People ask us why we're still in power after criticising govt. This is our politics & we'll decide what we want to do: Uddhav Thackeray, Shiv Sena pic.twitter.com/deZ7xlAzpo
— ANI (@ANI) June 19, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.