HW News Marathi
शिक्षण

नवकलावंतांसाठी जहांगिरमध्ये प्रदर्शनाची संधी

अतुल चव्हाण /अश्विनी सुतार

मुंबईः महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईतील जहांगिर कला दालनात कला प्रदर्शनाचे 24 जुलैपासून आयोजन करण्यात आले आहे. उत्कृष्ठ कलाकृतीला योग्य बक्षिस दिले जाणार आहे.

आपल्या कलाकृतीचे सादरीकरण मुंबईतील जहांगीर आर्ट दालनात भरावे, अशी प्रत्येक कलावंतांची इच्छा असते. अनेक अनुभवी व नावाजलेले कलावंत या ठिकाणी प्रदर्शन भरवतात. परंतु हिच संधी नवख्या कलावंतांना मिळाल्यास त्यांच्यासाठी गगण ठेंगणे होऊन जाईल. नवकलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी 24 जुलैपासून जहागिर आर्ट गॅलरीत मान्सून आर्ट शो चे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील महाविद्यालयीन मुला-मुलांसाठी आपली कला या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. उत्कृष्ठ कलाकृतीं विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. तसेच त्यांनी पारितोषिकही ठेवण्यात आले आहे. या प्रदर्शनाद्वारे नवकलावंतांनी आपल्या कलाकृतीतून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. तो कौतुकास्पद आहे. भारतीय सिमारेषांवरुन जो वाद सध्या सुरू आहे, त्यावर कटाक्ष टाकण्याचा प्रयत्न आपल्या चित्रातून केला असल्याचे अतुल चव्हाण अश्विनी सुतार यांना नवकलावंतांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक महाविद्यालयात प्रवेश बंद

News Desk

विद्यापीठ आणि महाविद्यालयीन अध्यापकांची मेगा भरती

News Desk

राज्यसेवा पूर्व परिक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्माक आदेश    

News Desk