HW News Marathi
शिक्षण

पेट,नेट,सेट,गेट ,एम.फिलसह संशोधक विद्यार्थ्यांची ४ व ५ मे रोजी विद्यापीठीत बैठक  

आर.ए.सी.(रिसर्च अलोकेशन कमिटी)ची बैठक

उत्तम बाबळे

नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये दि.४ व ५ मे, २०१७ रोजी वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आर.ए.सी.(रिसर्च अलोकेशन कमिटी)ची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पेट-२०१६ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या किंवा त्यातून सूट मिळालेल्या संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक देण्यासाठी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या हॉल क्र. ३११ मध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

पेट २०१६च्या माहिती पुस्तिकेत नमूद केल्यानुसार रिक्त जागांची पेट पास उमेदवारांसाठी ६० टक्के व पेट परीक्षेतून सूट प्राप्त उमेदवारांसाठी ४० टक्के अशी विभागणी करण्यात येणार आहे. पेट परीक्षेतून सूट असलेल्या उमेदवारांसाठी रिक्त असलेल्या जागांमध्ये नेट, सेट, गेट यासाठी २० टक्के, एम.फिल.साठी २० टक्के आणि अनुभवी शिक्षकांसाठी २० टक्के प्रमाणे जागा विभागून सामाजिक आरक्षण विचारात घेऊन मार्गदर्शक उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया मार्गदर्शकांकडे उपलब्ध असलेल्या रिक्त जागा व त्यांच्या संमतीवर अवलंबून राहणार आहे. संबंधीत विषयात पेट २०१६ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या किंवा परीक्षेतून सूट मिळालेल्या विद्यार्थ्यांची आणि रिक्त जागांची संख्या लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी आर.ए.सी.च्या बैठकीस उपस्थित रहावे.

पेट २०१६उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरलेला पेट २०१६चा अर्ज, शैक्षणिक कागदपत्रे व शुल्क भरलेल्या पावतीसह सादर करून पेट पास प्रमाणपत्र घ्यावे तसेच पेट २०१६ परीक्षेतून सूट मिळालेल्या उमेदवारांनी दि.२४ एप्रिल पासून विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागात त्यांचे वैधता प्रमाणपत्र घ्यावेत.

आर.ए.सी. बैठकीस उपस्थित राहणाऱ्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांनी त्यांची मुळ कागदपत्रे व त्याच्या साक्षांकित छायाप्रतीचा एक संच, जसे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिका, नेट, सेट, गेट प्रमाणपत्र, पेट २०१६ परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र, पेट परीक्षेतून सूट मिळाल्याचे वैधता प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, एम.फिल.प्रमाणपत्र (लागू असल्यास) इत्यादी सादर करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे सदर आर.ए.सी. बैठकीस सामोरे जाणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांनी संशोधन कार्य हाती घेण्याची त्यांची क्षमता सिद्ध करणे अपेक्षित आहे.

सर्व संशोधक विद्यार्थ्यांनी याची नोंद घेऊन आपआपल्या विषयाच्या आर.ए.सी. बैठकीस उपस्थित रहावे तसेच अधिक माहितीसाठी विद्यापीठ संकेतस्थळाला भेट द्यावी, असे पदव्युत्तर विभागाचे उपकुलसचिव यांनी कळविले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिष्यवृत्ती परिक्षेत ऋुतिका हाके लातुर विभागात अव्वल

News Desk

अनुदान, बीजभांडवल योजनेचा बँकेमार्फत लाभ देण्यासाठी अर्ज करा

News Desk

महाविद्यालयाच्या उपक्रमातून उद्योजकतेचे धडे, आंबेडकर महाविद्यालयाचा अनोखा कार्यक्रम

News Desk