HW News Marathi
शिक्षण

डिएसकेंना आता पाठ्यपुस्तकात स्थान नाही…

पुणे | गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिद्ध व्यवसायिक डी एस कुलकर्णी सध्या तुरुंगात आहेत. आर्थिक गुह्यात शिक्षा भोगत असलेल्या दीपक सखाराम कुलकर्णी तथा डीएसके यांच्यावरील वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमात असणारा धडा तूर्तास वगळण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले विद्यापीठाने घेतला आहे. यासंबंधीचे परिपत्रक विद्यापीठाने काढल्याने सध्या धडय़ावरून होणाऱ्या वादावर पडदा पडल्याच पहायला मिळत आहे.

वाणिज्य शाखेच्या प्रथम आणि तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात बांधकाम व्यावसायिक डीएसके यांच्यावर आधारीत एक धडा होता. ‘यशोगाथा’ या पुस्तकातही डीएसकेंवर एक प्रकरण आहे. यामध्ये त्यांचा संघर्ष, यश, प्रेरणा यांचा समावेश असून, प्रा. प्र. चिं. शेजवळकर हे त्यांचे लेखक आहेत. त्यांनी समाजातील काही प्रतिष्ठीत आणि प्रेरणादायी व्यक्तींवर लिहिले आहे.

डीएसके यांच्यावरील धडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात कसा? असा प्रश्न प्राध्यापक आणि काही विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला होता. हा धडा वगळण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर हा धडा वगळण्यात आला आहे. डीएसके यांच्यावर सध्या खटला सुरू आहे. अनेक लेखकांनी तो काढून टाकण्याचे सुचविले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुमच्या पगारापेक्षा बाराशेपट अधिक पगार घेतात सीईओ

News Desk

व्यवसाय परीक्षेचा अर्ज भरण्याबाबत नांदेड आयटीआयमध्ये प्रशिक्षण                                                                                

News Desk

बारावी परीक्षेचा उद्या निकाल

News Desk