HW News Marathi
शिक्षण

माजी सैनिकांच्या दोन पाल्यांना शिक्षणासाठी १२ हजार रुपयाची आर्थिक मिळणार

उत्तम बाबळे

नांदेड :- नांदेड जिल्हयातील माजी सैनिक व सैनिक विधवांच्या (हवालदार पदापर्यत) दोन पाल्यांसाठी १२ हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात येणार असून जे पाल्य सन २०१६ -१७ या वर्षात इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत, त्यांनी ऑनलाईन अर्ज केंद्रीय सैनिक बोर्ड नवी दिल्ली यांचेकडे मंगळवार २० जुन २०१७ पर्यत सादर करावेत.असे आवाहन करण्यात आले आहे.

माजी सैनिक व सैनिक विधवांच्या पाल्यांना पुढील शिक्षणासाठी थोडी आर्ज्याथीक मदत व्हावी या उद्देशाने केंद्र शासनाच्या केंद्रीय सैनिक बोर्डाच्या वतीने दोन पाल्यांना १२ हजार रुपयाची आर्थीक मदत करण्यात येणार आहे.तसेच माजी सैनिकांच्या विधवांनी पेनुरी, मॅरेज मदतीसाठी अर्ज सादर केले नाहीत त्यांनीही ऑनलाईन अर्ज सादर करावे,त्यांनाही सहकार्य करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज www.ksb.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध्‍ा आहेत. अधिक माहितीसाठी नांदेड जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कप्तान सुनिल गोडबोले यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

स्वारातीमविची एम.फिल. प्रवेशपूर्व परीक्षा ५ मार्चला

News Desk

म.रा.पत्रकार संघ तालुका कार्यकारणी घोषीत

News Desk

मेडशी जिल्हा परिषद शाळेत संगणक व इ लर्निंग लोकार्पण सोहळा

News Desk
देश / विदेश

रेल्वेगाडी 20 सेकंद लवकर सोडल्यामुळे प्रवाशांची माफी, जपानच्या खाजगी रेल्वेकंपनीने मागितली माफी

News Desk

सेकंदांचा हिशोब ठेवणाऱ्या जपानच्या वक्तशिरपणाचा जगाला पुन्हा एकदा प्रत्यय

टोकियो : ‘प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत अशा अनेक प्रकारच्या अनाउंसमेंट आपण आल्यादिवशी भारतातील रेल्वे स्टेशन्सवर ऐकत असतो. भारतातल्या रेल्वेगाड्या उशीराने धावणे अथवा रद्द होणे आपल्यासाठी नवीन नाही. त्यातच एखादी गाडी वेळेत प्लॅटफॉर्म वरुन सुटली तर आपल्याला आश्चर्य़ाचा धक्का बसतो. मात्र जपानमध्ये काहीसा वेगळा प्रकार घडलाय. जपानमध्ये एका खाजगी कंपनीची रेल्वेगाडी वेळेच्या २० सेकंद आधी सुटल्यामुळे या कंपनीने दिलगीरी व्यक्त केली आहे. टोकियोच्या मिनामी नागारेयामा या रेल्वे स्टेशनवरुन सुकुबा एक्सप्रेस या गाडीची सुटण्याची वेळ ९ वाजून ४४ मिनीटं ४० सेकंद अशी होती. मात्र मंगळवारी या गाडीने २० सेकंद लवकर प्लॅटफॉर्म सोडला. या घटनेनंतर संबधित कंपनीने माफी मागत याबाबत कर्मचाऱ्यांना तंबी दिली असल्याचं एका प्रेस रिलीजदवारे नमुद केले. गाडीच्या मोटरमनने गाडीचे वेळापत्रक नीट तपासलं नसल्यानं हा प्रकार घडल्याचं स्पष्टिकरण या कंपनीने दिले आहे. विशेष म्हणजे ही गाडी सुटल्यानंतर लगेचच ४ मिनीटाला दुसरी गाडी होती. मात्र तरीही आपली चुक मान्य करत या कंपनीने प्रवाशांची माफी मागितली. या घटनेमुळे सेकंदांचा हिशेब ठेवणाऱ्या जपानच्या वक्तशिरपणाची प्रचिती पुन्हा एकदा जगाला आली आहे.

Related posts

बंगालमध्ये राहायचे असे तर बंगाली भाषा आलीच पाहिजे !

News Desk

मोठी बातमी! मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाकडून रद्द

News Desk

उदयनराजेंच्या समर्थनार्थ संभाजी भिंडेंची सांगली बंदची हाक!

Arati More