HW News Marathi
देश / विदेश

मोठी बातमी! मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाकडून रद्द

नवी दिल्ली | मराठा समाजासाठी आजचा दिवस महत्वाचा होता. आज (५ मे) सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावर सुनावणी होणार होती. त्याकडेच मराठा समाजाचे, मुख्यमंत्र्यांकडे सगळ्यांचेच लक्ष होते. मात्र, सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करणाचा धक्कादायक निर्णय दिला आहे. राज्य सरकारचा मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टाने आज रद्द केला आहे. तसेच, मगासवर्गीय आयोगाचा निर्णयात कोर्टाने थांबवला आहे.

१९९२ मध्ये इंद्रा सहाणी खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने ५० टक्के आरक्षण मर्यादा घालून दिली होती. नऊ सदस्यीय खंडपीठानं हा निकाल दिला होता. त्यामुळे मराठा आरक्षण देण्यासाठी करण्यात आलेल्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देण्यात आलेलं होतं. या याचिकांवरील सुनावणी पूर्ण झाली झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. अखेर सुप्रीम कोर्टाने निकाल सुनावला असून आरक्षण रद्द केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पतंप्रधान नरेंद्र मोदींची देहरादूनमध्ये योगासने

swarit

Dongri Building Collapsed : पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या सहवेदना

News Desk

संस्कृत केवळ ब्राम्हणांची भाषा नाही

News Desk