HW News Marathi
शिक्षण

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी १० जुलै पर्यंत अर्ज करू शकता

उत्तम बाबळे

नांदेड :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रे, गुणपत्रक व पुढील वर्गात प्रवेश घेतल्याच्या पुराव्यासह सोमवार १० जुलै २०१७ पर्यंत सादर करावीत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदवीव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी आदी आभ्यासक्रमामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचे वितरण केले जाणार आहे. सन २०१६ – १७ या शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्याने ८० टक्के गुणाने उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम बारा पोट जातीतील विद्यार्थ्यांना महामंडळाकडून ज्येष्ठता व गुणक्रमानुसार उपलब्ध निधीच्या अधीन राहून अण्णाभाऊ साठे गुणवत्ता शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे.

अर्ज जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हिंगोली रोड नांदेड या ठिकाणी देण्यात यावीत. सोमवार १० जुलै नंतर अर्ज स्विकारल्या जाणार नाहीत,याची संबंधीतांनी नोंद घ्यावी असेही आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अमेरिकेत शिक्षणासाठी दरवर्षी घ्यावी लागणार परवानगी

News Desk

“उज्ज्वल नांदेड” अंतर्गत एमपीएससी टॉपर्सचे ५ जुलै रोजी मार्गदर्शन 

News Desk

Teachers Day | शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सांभाळला शाळेचा संपुर्ण कारभार

News Desk
मुंबई

नेवाळीतलं शेतकऱ्यांचं आंदोलन पेटलं

News Desk

कल्याण – नेवाळी परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जागेवर पेरणी करण्यासाठी रोखण्यात आल्यानं शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला हिंसक स्वरूप आलंय. कल्याण-नेवाळी परिसरातील शेतकऱ्यांची जमीन सरकारनं बळजबरीनं संपादीत केली होती. त्याविरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनानं हिंसक स्वरूप धारण केलंय. मलंगगडाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर हे आंदोलन सुरू कऱण्यात आलंय. यावेळी आंदोलकांनी पोलिसांच्या काही गाड्या पेटवून दिल्याची माहिती समोर येतेय. तसंच काही पोलिसही यावेळी जखमी झाल्याची माहिती पुढं येतेय.

तत्कालीन इंग्रज सरकारनं मलंग रोडवरील नेवाळी येथील १,६०० एकर जागा ताब्यात घेतली होती. त्यातील काही जागा शेतकऱ्यांच्या ताब्यात आहे तर बहुतांश जागेवर अतिक्रमण झालंय. त्यामुळं या जागेवर संरक्षण विभागाचा की स्थानिक शेतकऱ्यांचा हक्का आहे, याविषयी संभ्रम कायम आहे. या जागेच्या मालकीबाबत कोणतीही माहिती प्रशासनाकडून दिली जात नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. ही जागा केंद्र सरकारने अजूनही शेतकऱ्यांना परत केलेली नाही. या जागेवर आता नौसेनेने ताबा घेतला आहे. तेथे संरक्षक भिंत उभारली जाणार आहे. नेवाळी येथे विमानतळ होणार होते. मात्र, नियोजित विमानतळ नवी मुंबई येथे होत असल्याने आता नौसेनेला ही जागा कशासाठी हवी आहे, असा सवाल बाधित शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

नेवाळी परिसरात संपादित केलेली एक हजार ६५० एकर जागा आजपासच्या १८ गावांतील शेतकऱ्यांची आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारत सरकारने ही जागा शेतकऱ्यांना परत करणे अपेक्षित होते. मात्र, सरकारने ही जागा संरक्षण खात्याकडे वर्ग केली. संरक्षण खात्याने ही जागा नौसेनेला दिली आहे. या जागेवर नौसेनेने संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घेतले आहे. शेतकऱ्यांच्या जागा परत न करता तेथे संरक्षण भिंत उभारण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.

Related posts

मुख्यमंत्री सचिवालयातील जन माहिती अधिकाऱ्यास दंड

News Desk

डॉ.अमरापूरकर मृत्यूप्रकरणी चौघांना अटक

News Desk

मुंबईत आढळले स्वाईन फ्लूचे ७ रुग्ण

News Desk