HW News Marathi
शिक्षण

Teachers Day | शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सांभाळला शाळेचा संपुर्ण कारभार

मुंबई | आज ५ सप्टेंबर शिक्षक दिन… शिक्षक हा सामाजाचा निर्माण कर्ता आहे. छोट्या बालकाचे देशाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून परिवर्तन करण्याचे कार्य शिक्षकाला कारायचे असते. त्याचमुळे या दिवसाला फार महत्त्व आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस… हाच दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती शिक्षकांच्या भूमिकेचं महत्त्व आणि भविष्यातील पिढ्यांच्या जागरुकतेसाठी हा दिवस साजरा केला जातो.

‘गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।

गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।’

शिक्षक दिन अनोख्या पद्धतीने साजरी –

शिक्षक दिन हा केवळ भारतातच साजरा केला जातो असं नाही… जगभरात वेगवेगळ्या दिवशी का होईना पण हा दिवस साजरा करतात. आज शिक्षक दिनानिमित्त कुर्ला येथील श्री गाडगे महाराज विद्यालयात शिक्षक दिन अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी संपूर्ण शाळेचा एक दिवसीय कारभार सांभाळून शिक्षकांना शिक्षक दिनाची अनोखी भेट दिली. यामध्ये विद्यार्थ्यांनी शाळेतील मुख्याध्यापकांपासून ते शाळेतील शिपाई पर्यंत सर्वांच्या भूमिकेत शाळेतील कारभार सांभाळला.

श्री गाडगे महाराज विद्यालयात शिक्षक दिन १९७२ सालापासून सुरू आहे. शाळेचा संपूर्ण एक दिवसीय कारभार विद्यार्थी सांभाळतात. याचे कारण असे की, शिक्षक शिकवत असतांना विद्यार्थी बेशिस्त पणे वागतात. त्यावेळी शिक्षकांना काय वाटतं हे विद्यार्थ्यांना कळावे यासाठी आजच्या दिवशी या कार्यक्रमाचे आम्ही आयोजन केलं होत. असे शाळेचे मुख्याध्यापक गोडे एस. के. यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुमच्या पगारापेक्षा बाराशेपट अधिक पगार घेतात सीईओ

News Desk

शिक्षणापासून दूर गेलेल्या वर्गाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी दूरशिक्षण केंद्राची महत्त्वाची भूमिका – कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर

News Desk

शास्त्रीय कला , चित्रकला व लोककला सहभाग घेणा-या विद्यार्थ्यांना वाढिव गुण देणार :  राज्य शिक्षण मंडळ  

News Desk