HW News Marathi
शिक्षण

सत्तेत आल्यानंतर जावडेकरांना स्वतःच्याच आश्वासनांचा विसर | काँग्रेस प्रदेश शिक्षक सेल

मुंबई | “शाळांनी आर्थिक मदतीसाठी भिकेचा कटोरा घेऊन सरकारकडे येण्यापेक्षा आपल्याच माजी विद्यार्थ्यांकडून मदत घ्यावी,” असे वादग्रस्त विधान केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरावरून टीकेची झोड उठली आहे. आता शिक्षकांनी देखील जावडेकरांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. सत्तेत आल्यानंतर जावडेकरांना आपल्याच आश्वासनांचा विसर पडला आहे, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलने तीव्र टीका केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश शिक्षक सेलचे अध्यक्ष मनोज पाटील म्हणाले की, विरोधी पक्षात असताना स्वत: प्रकाश जावडेकर यांनी शाळांना अनुदान व शिक्षकांना वेतन मिळावे, यासाठी शिक्षक व शाळांच्या आंदोलनात सहभाग नोंदवला होता. एवढेच नव्हे तर भाजप सत्तेवर आल्यास १०० टक्के अनुदान देईल, असे आश्वासनही त्यांनी दिले होते. मात्र आता सत्ता येताच त्यांना स्वतःच्या वक्तव्ये आणि आश्वासने आठवेनाशी झाली आहेत, अशी तीव्र टीका पाटील यांनी केली.

अन्य शाळांनीही हाच आदर्श घ्यावा

पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीमध्ये आयोजित कार्यक्रमात जावडेकरांनी हे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यामुळे आता शिक्षकांनी देखील जावडेकर यांच्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ज्ञानप्रबोधिनीच्या प्रगतीत माजी विद्यार्थ्यांना मोठा वाटा आहे, अन्य शाळांनी देखील हाच आदर्श घ्यावा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. जावडेकर यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली आहे.

Related posts

सचिन साबू यांना अमेरिकेतील सर्वोच्च बहुमानाचा सन्मान

News Desk

हिंदी आणि भारतीय भाषा वाचवणार, प्रकाश जावडेकरांचे आश्वासन

News Desk

बारावीचा निकाल जाहीर, राज्यात मुलींची बाजी

News Desk