HW News Marathi
शिक्षण

अर्गो इन्श्युरन्स अवेरनेस अॅवॉर्ड ज्युनिअर क्विज २०१८

मुंबई| भारतातील आघाडीची बिगर जीवनविमा कंपनी असलेल्या एचडीएफसी अर्गो जनरल इन्श्युरन्सने मुंबईमध्‍ये उपांत्यफेरीसह इन्श्युरन्स अवेरनेस अॅवॉर्ड ज्युनिअर क्विज २०१८ च्या तिस-या सत्राची सुरुवात केली. मुंबईतील ३० शाळांनी या स्पर्धेत भाग घेतला. मुंबईतील विजेता संघ डीएव्‍ही पब्लिक स्‍कूल २७ सप्टेंबर २०१८ रोजी मुंबईत होणा-या अंतिम फेरीत मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू, चेन्नई,हैदराबाद, अहमदाबाद व रांची सह आठ शहरांचे प्रतिनिधित्व करणा-या टीम्सशी सामना करेल.

गेल्या वर्षी चेन्नई येथील पद्मशेषाद्री बालभवन स्कूलने एचडीएफसी अर्गो जनरल इन्श्युरन्स अवेरनेस अॅवॉर्ड ज्युनिअर हे पारितोषिक पटाकवले होते.

विम्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी व या क्विजच्या आधी एचडीएफसी अर्गोचे प्रतिनिधी टाऊन हॉल्सच्या माध्यमातून शाळेतीलविद्यार्थ्यांना जीवनाबाबत मुलभूत माहिती देतात. या उपक्रमाद्वारे एचडीएफसी अर्गो आठवी व नववीत शिकणाऱ्या मुंबईतील ६००० हून अधिकविद्यार्थ्यांपर्यंत पोहचली आहे, ज्यामध्ये श्रीम. सुलोचना देवी सिंघानिया स्‍कूल, जीडी सोमानी, स्‍वामी विवेकानंद हायस्‍कूल, सेंट झेवियर्स हायस्‍कूल, बॉम्‍बे स्‍कॉटिश स्‍कूल इत्यादींचा समावेश आहे.

मुंबईतील उपांत्य फेरीबाबत बोलताना एचडीएफसी अर्गो जनरल इन्श्युरन्सचे कार्यकारी व्यवस्थापन सदस्य व ग्रुप हेड महमूद मन्सूरीम्हणाले की, एचडीएफसी अर्गो इन्श्युरन्स अवेरनेस अॅवॉर्ड ज्युनिअर क्विज हा उपक्रम नवीन पिढीला विम्याबाबत ज्ञान प्रदान करणे असून हीप्रश्‍नमंजुषा अधिक मनोरंजक पध्दतीने सादर केली गेली आहे. तिसर्या सत्रामध्ये आमचे उद्दिष्ट देशात ९ शहरातील ५०,००० हून अधिकविद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे आहे. मुंबईत झालेल्या आमच्या पहिल्या उपांत्य फेरीचा प्रतिसाद पाहून आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.

एचडीएफसी अर्गो इन्श्युरन्स अवेरनेस अॅवॉर्ड ज्युनिअर क्विज हा प्रश्‍नमंजुषा अधिक मनोरंजक पध्‍दतीने सादर करण्‍याच्‍या माध्‍यमातून देशभरातील विद्यार्थ्‍यांमध्‍ये विम्‍याबाबत ज्ञान प्रदान करणारा जागरुकता उपक्रम आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उल्हासनगरमध्ये राजकीय वैमनस्यातून तुफान हाणामारी

News Desk

स्कूलबस चालकाचा मुलगा सीएसच्या परीक्षेत अव्वल

News Desk

बारावी परीक्षेचा उद्या निकाल

News Desk