HW News Marathi
शिक्षण

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक महाविद्यालयात प्रवेश बंद

मुंबई | सेंट झेव्हियर्स महाविद्यालय आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑन मायनॉरिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूट यांनी मुंबई उच्च न्यायालयात 12 ऑक्‍टोबर 2017 मध्ये याचिका केली होती. त्यावरील निर्णयाची अंमलबजावणी यंदापासून होत आहे. विद्यापीठाशी संलग्न अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे दरवाजे बंद झाले आहेत.

मुंबई विद्यापीठाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार 15 टक्के व्यवस्थापन कोटा, 42 टक्के अल्पसंख्याक कोटा आणि 43 टक्के जागा खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहेत. यामधे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेशच बंद केला आहे.

छात्रभारती विद्यार्थी संघटनेसह मनविसे, काँग्रेस, राष्ट्रवादी, प्रहार, जेडीएस, यांनी आज मंत्रालयामध्ये सिताराम कुंटे सचिव उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य व समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांच्या कॅबीन समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले व निवेदन दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डिएसकेंना आता पाठ्यपुस्तकात स्थान नाही…

News Desk

NEET – तात्पुरती गुणवत्ता यादी 20 फेब्रुवारी रोजी प्रसिध्द होणार

News Desk

छात्र भारती आक्रमक, एल्फिन्स्टन कॉलेजवर अॅट्रॉसिटी दाखल करणार  

News Desk