HW News Marathi
शिक्षण

महाविद्यालयाच्या उपक्रमातून उद्योजकतेचे धडे, आंबेडकर महाविद्यालयाचा अनोखा कार्यक्रम

मुंबई | नालंदा एज्युकेशनल फाऊंडेशन (संचलित) डॉ. बाबासाहेब आंबेडकर वरिष्ठ महाविद्यालय चेंबूर यांच्या सेल्फ फायनान्स या विभागाच्या वतीने Enterpreneurs fair ( उद्यम मेळा ) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी बनवलेले विविध प्रकारचे खाद्य पदार्थ, हस्त कौशल्याने बनवलेल्या वस्तू तसेच विविध बौद्धिक खेळाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा विद्यार्थ्यामध्ये व्यवसाय करण्याची जिद्द, क्षमता आणि कौशल्य निर्माण करणे असा होता. या विभागाच्या प्रमुख प्रा. समीरा इब्राहिम यांनी कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे उदघाटन विभागातील विद्यमान नगरसेविका संगिता हंडोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

महाविद्यालयातील 500 हून आधिक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला. तसेच महाविद्यालयाच्या संचालिका सोनल शेंडकर आणि इतर शाखेतील शिक्षक वर्गांने या ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.या कार्यक्रमात 23 काउंटर होते. प्रा. मनोहर भोईर सरांनी भाग्यवान विजेता सोडत अशा खेळाचे आयोजन करून कार्यक्रमात अजून रंगत आणली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रतिकुल परिस्थीतीवर मात करून मिळवलं कौतुकास्पद यश

swarit

NEET – तात्पुरती गुणवत्ता यादी 20 फेब्रुवारी रोजी प्रसिध्द होणार

News Desk

आर.एम.भट हायस्कूल शताब्दी सोहळा साजरा

News Desk