HW News Marathi
शिक्षण

गोवंडी मधील पालिका शाळेत विद्यार्थ्यांना औषधातून विषबाधा ?

मुंबई | गोवंडीतील महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेत औषधातून विषबाधा झाल्याने एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून जवळपास १९७ विद्यार्थ्यांना शुक्रवारी दुपारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मृत विद्यार्थिनीचं नाव चांदणी साहिल शेख (१२) असं आहे. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी राजावाडी आणि शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

शवविच्छेदन अहवाल –

गोवंडीतील बैंगनवाडी परिसरात संजय नगर महापालिका उर्दू शाळा क्र.२ मधील मृत चांदणी शेख हिचा शवविच्छेदन अहवाल जे जे रुग्णालयात तयार करण्यात आला आहे. मृत्यूचे कारण असे आहे की, ‘ब्रोन्को-पल्मोनरी रक्तस्राव आढळून आले आहे. रासायनिक विश्लेषण आणि हिस्टो-पॅथॉलॉजीकल प्रशिक्षणाचा अंतिम अहवाल येण्याचे बाकी आहे. तसेच काही विद्यार्थ्यांचे अद्याप उपचार सुरू आहेत.

कशी घडली घटना?

गोवंडीतील बैंगनवाडी परिसरात संजय नगर महापालिका उर्दू शाळा क्र.२ ही शाळा आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाच्या कार्यक्रमानुसार दर सोमवारी कॅल्शियम आणि रक्तवाढीसाठी आयर्न आणि फाॅलिक अॅसिड या गोळ्यांचं वाटप केलं जातं. त्यानुसार ६ आॅगस्टला विद्यार्थ्यांना या गोळ्या देण्यात आल्या. या गोळ्या खाल्यानंतर दोन दिवसांनी विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाब आणि छातीत जळजळीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे पालकांनी त्वरित मुलांना पालिका रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. त्यानंतर १६१ विद्यार्थ्यांना तपासणीसाठी राजावाडी रुग्णालयात तर, ३६ विद्यार्थ्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यापैकी शताब्दी रुग्णालयातील २२ विद्यार्थ्यांना तपासणीनंतर घरी सोडण्यात आलं.

सहावीत शिकणाऱ्या चांदणीनेही याच गोळ्या खाल्ल्या. त्यानंतर चांदणी मंगळवारी शाळेत गैरहजर होती. बुधवारी आणि गुरूवारी ती शाळेत हजर झाली आणि शुक्रवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी पद्मजा केसकर यांनी दिली. शाळेत खिचडी खाल्ल्यानंतर ही गोळी देण्यात येते. त्यामुळे विषबाधा नक्की खिचडीमुळे झाली की गोळ्यांमुळे याबाबत संभ्रम आहे. यामुळे गोळ्यांची पाकिटे ताब्यात घेऊन या पाकिटांची उपायुक्तांमार्फत चौकशी करण्याची मागणी सपाचे महापालिका गटनेते रईस शेख यांनी केली आहे.

गोळ्यांचं प्रमाण ‘असं’ –

संजय नगर महापालिका उर्दू शाळेत सकाळच्या सत्रात ६०७ आणि दुपारच्या सत्रात ६३२ असे एकूण १२३९ विद्यार्थी शिकतात. यापैकी पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दर सोमवारी आयर्न आणि फाॅलिक अॅसिडची ४५ मिली ग्रॅम वजनाची प्रत्येकी एक गोळी देण्यात येते. तर सहावी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०० मिली ग्रॅमची गोळी देण्यात येते.​

अनेक विद्यार्थ्यांना भीतीमुळे पालकांनी रुग्णालयात दाखल केले होते. काही मुलं गंभीर होती तर काहीची प्रकृती स्थिर होती. असे डॉ. विद्या ठाकूर वैद्यकीय अधिक्षक राजावाडी यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी सैनिकांच्या दोन पाल्यांना शिक्षणासाठी १२ हजार रुपयाची आर्थिक मिळणार

News Desk

अनुदान, बीजभांडवल योजनेचा बँकेमार्फत लाभ देण्यासाठी अर्ज करा

News Desk

मुला-मुलींसाठी विशेष योगाभ्यास वर्गाचे आयोजन

News Desk