HW News Marathi
महाराष्ट्र

या दिग्गजांनी चुकवला वाहतुकीचा दंड

मुंबई | वाहतूक विभागाकडून नियमांचे उल्लंघन केल्यानंतर झालेला दंड न भरणाऱ्यांची यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये अभिनेता सलमान खान , मनसेप्रमुख राज ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासह अनेक दिग्गजांची नावे असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मात्र, आपल्याला या दंडाबाबत काहीही माहित नसून वाहनचालकाने वाहतूक नियम मोडले असल्याचे स्पष्टीकरण मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले आहे.

सिग्नल तोडणे, नो एन्ट्रीमध्ये वाहन नेणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहनं उभी करणे अशा नियमभंगांसाठी दंड आकारला जातो. पण मुंबईत हा दंड इतर शहरांप्रमाणे रस्त्यावर ट्रॅफिक पोलीस वसूल करत नाहीत. नियम तोडणाऱ्या वाहनांच्या मालकांना दंडाचे ई-चलान वाहतूक विभाग पाठवते. त्या ई-चलाननुसार वाहनांच्या मालकांना ऑनलाइन दंड भरावा लागतो. दंड न भरणाऱ्यांच्या यादीत अभिनेता सलमान खान, मनसेप्रमुख राज ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, परिवहन मंत्री दिवाकर रावते, विनोदवीर कपिल शर्मा, भाजप नेते राम कदम यांच्यासह अनेकांची नवे असल्याचे वृत्त समोर आले आहे. तर अभिनेता अर्जुन कपूरने ई चलान द्वारे पाठविण्यात आलेला दंड भरला असल्याची माहिती समोर येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“संभाजीनगर म्हणा, धाराशिव म्हणा,या प्रकरणाकडे मी गांभीर्यानं बघत नाही” – शरद पवार

News Desk

Independence Day | देशभरात ७२ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

swarit

महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात – मुख्यमंत्री

News Desk