HW News Marathi
शिक्षण

सीतेला रामाने पळवले, गुजरात बोर्ड

गांधीनगर | सीतेला कोणी पळवले या प्रश्नाचे उत्तर तुम्हा आम्हाला सर्वांच माहिती आहे. परंतु बहुदा या प्रश्नाचे उत्तर गुजरात बोर्डला माहित नसल्याचे चित्र बारावीच्या संस्कृत पुस्तकात दिसून आले. या पुस्तकात चक्क सीतेला रामाने पळवनल्याचे म्हटले आहे. यावरुन रामायण घडले, त्यामुळे गुजरात बोर्डावर सर्व स्तरातून टीका होत आहे.

“रामाचे विचार कवीने अत्यंत उत्तमरित्या मांडले आहेत. सीतेला जेव्हा रामाने पळवले, तेव्हा लक्ष्मणाने रामाला दिलेल्या हृदयस्पर्शी संदेशाचे वर्णन केले आहे” असे या पुस्तकात म्हटले आहे. बारावीच्या संस्कृत पुस्तकाच्या १०६ नंबरच्या पानावर हा उल्लेख केला आहे. “संस्कृत साहित्याची ओळख” यामध्ये अनेक चुका आहेत.

राजस्थान बोर्डाचीही चूक

‘अठराव्या व एकोणिसाव्या शतकातील राष्ट्रीय चळवळ’ या धड्यामध्ये टिळकांचा दहशतवादाचे जनक असा उल्लेख करण्यात आला आहे.’ टिळकांनी देशाला चळवळीचा मार्ग दाखवला. राज्यस्थानमधील इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता आठवीच्या समाजशास्त्राच्या रेफरेन्स पुस्तकात असा उल्लेख केला आहे.

राजस्थान माध्यमिक शिक्षण मंडळाच्या खासगी इंग्रजी माध्यमिक शाळेने मुथरेतील प्रकाशाकडून हे पुस्तक छापून घेतले आहेत. त्यात पान क्रमांक 267 वरील 22 व्या प्रकरणात “Tilak demonstrated a path towards national movement, therefore, he is called as the father of terrorism” असे म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डिएसकेंना आता पाठ्यपुस्तकात स्थान नाही…

News Desk

सर्जनशील मोफत कार्यशाळा

News Desk

शिक्षणापासून दूर गेलेल्या वर्गाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी दूरशिक्षण केंद्राची महत्त्वाची भूमिका – कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर

News Desk