HW News Marathi
शिक्षण

सीबीएसईचा निकाल ८३.०१ टक्के 

नवी दिल्ली | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाचा निकाल आज जाहिर झाला. बोर्डाच्या २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात गाझियाबादची मेघना श्रीवास्तव देशात पहिली आली आहे.

बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येत आहे. यंदा सीबीएसईचा निकाल ८३.०१ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालात १ टक्के वाढ झाली आहे. गतवर्षी निकाल ८२.०२ टक्के होता.

मार्च-एप्रिल महिन्यात पार पडलेल्या या परीक्षेला देशभरातून एकूण ११, ८६, ३०६ विद्यार्थी बसले होते.४,१३८ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. पेपर लीक झाल्यामुळे ही परीक्षा वादात भौव-यात सापडली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन नोंदणी करा

News Desk

सिडनेहॅम महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन

News Desk

शाळांना इंटरनेट आणि वायफायने जोडणार,शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा

News Desk