HW News Marathi
शिक्षण

मुंबईतल्या ३५ शाळा होणार आंतरराष्ट्रीय

मुंबई | सर्वात मोठी महापालिका म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबई महापालिकेच्या ३५ शाळा आता आंतरराष्ट्रीय होणार आहेत. हा निर्णय पालिका शिक्षण विभागाने घेतला आहे. वेळोवेळी पालकांकडून होणारी आंतरराष्ट्रीय शाळांची वाढती मागणी आणि इंग्रजीकडे असलेला कल लक्षात घेऊन मुंबईत या आंतरराष्ट्रीय शाळा सुरू केल्या जाणार आहेत.

दहावीपर्यंतच्या या नवीन शाळा खासगी सहभागातून सुरू करण्यात येणार आहेत. मुंबई पालिका ही आठ भाषेतून लाखो विद्यार्थीना शिक्षण देत आहे. यासाठी पालिका दरवर्षी कोटयवधी रुपये खर्च करत आहे असे असताना सुद्धा पालिका शाळांचा दर्जा दिवसेंदिवस घसरत आहे. विद्यार्थी गळती वाढल्याने अनेक शाळा बंद पडल्या आहेत. तर काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पालिका शिक्षण विभागाने सार्वजनिक-खासगी सहभागाने (पीपीपी) शिशूवर्ग ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे ठरवले आहे.

या शाळांमध्ये खासगी संस्थांचे शिक्षक शिकवणार असले तरी महापालिकेमार्फत मिळणार्‍या मोफत वस्तू, पोषण आहार अशा सर्व सुविधा विद्यार्थ्यांना दिल्या जातील. गोरगरीब विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार पडणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे. याबाबतचा प्रस्ताव शिक्षण समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“उज्ज्वल नांदेड” अंतर्गत एमपीएससी टॉपर्सचे ५ जुलै रोजी मार्गदर्शन 

News Desk

भगवद्‌गीता वाटपाचे परिपत्रक मागे ?

News Desk

व्यवसाय परीक्षेचा अर्ज भरण्याबाबत नांदेड आयटीआयमध्ये प्रशिक्षण                                                                                

News Desk