HW News Marathi
शिक्षण

शिवाजी शिक्षण संस्थेत साजरी झाली मंगळागौर

अपर्णा गोतपागर। श्रावण म्हटले की, व्रतवैकल्याचा महिना म्हणून ओळखला जातो. हा श्रावण सर्व माहेरवाशिणींचा जिव्हाळ्याचा महिना असतो. या महिन्यात नवविवाहित महिला मंगळागौरीसाठी माहेरी येतात. मंगळागौर ही सौभाग्याची देवता असल्याने पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत केले जाते. नवविवाहिता सलग पाच वर्षे मंगळागौर करतात. परंतु आताच्या धकाधकीच्या जीवनात या मंगळागौरचा कुठे तरी महिलांना विसर पडला आहे.

आपली संस्कृती आणि परंपरा भावी पिढीत रुजविण्यासाठी शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने मंगळागौरीच्या माध्यामातून मुलांमध्ये संस्कार करत आहे. यामुळे भावी पिढीमध्ये संस्कृतीचे बीजं पेरण्यात येत आहे. गेल्या ६ वर्षापासून शिवाजी शिक्षण संस्था मंगळागौरीचा उपक्रम राबवित आहे.

शाळेतील मंगळा गौरीच्या कार्यक्रमात ३ ते १४ या वयोगटातील विद्यार्थींनी नृत्याविष्कार सादर केला. या चिमुकल्या मुलींचे नृत्याविष्कार पाहून उपस्थितांनी त्यांचे भरभरुन कौतुक केले. या मुलींनी ‘नाच गं घुमा’, ‘आंबा पिकतो रस गळतो’, ‘किस बाई किस दोडका किस’ अशा गाण्यांवर पारंपारिक नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली

.

शाळकरी मुलींनी एवढेच नाही तर झिम्मा, फुगडी, टाळ्यांवर धरलेला फेर हे सगळेच अंगावर रोमांच उभे करणारे होते. बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी असे विविध प्रकार त्यांच्या नृत्यात पाहायला मिळाले. या मुलींना शाळेत होणा-या मंगळागौरीमुळे पारंपारिक खेळ, गाणी यांची माहिती मिळते.

शाळेत परंपरा आणि संस्कृती यांची माहिती शालेय जीवनात विद्यार्थ्यांना मिळावी असा शाळेच्या नेहमीच प्रयत्न असतो. तसेच पुढच्या पिढीने हा संस्कृतीचा वारसा जपावा म्हणून आम्ही हा उपक्रम राबवित असल्याचे शिवाजी शिक्षण संस्थेच्या मुख्याध्यापिका फरिदा संनदे यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्जनशील मोफत कार्यशाळा

News Desk

स्कूलबस चालकाचा मुलगा सीएसच्या परीक्षेत अव्वल

News Desk

हिंदुजा कॉलेज मधील बॅचलर ऑफ ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

swarit