HW News Marathi
शिक्षण

पवई आयआयटीत चोरांचा धुमाकूळ 

मुंबई | पवई आयआयटीत आज हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ह्या स्पर्धेत राज्यभरातील अनेक धावपटू सहभागी झाले होते. ह्याचाच फायदा घेऊन चोरांनी जवळपास 12 वाहनांच्या काचा फोडून वाहनांमधील सर्व मौल्यवान वस्तू चोरल्याची घटना पवई आयआयटीत घडली आहे. चोरांनी गाड्यांमधून रोख रक्कम, मोबाईल, बॅग, लॅपटॉप अशा वस्तू चोरल्याची माहिती मिळत आहे.

पवई पोलीस ठाण्यात 12 वाहनांच्या काचा फोडल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पोलिसांकडून आयआयटी परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या सहाय्याने चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. हाफ मरेथॉनसाठी मुंबईबाहेरून आलेल्या धावपटूंचे या चोरीमुळे जबर नुकसान झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार, ३५ हजार विद्यार्थी नापास

News Desk

महाराष्ट्र मेडीकल कॉन्सिलवर डॉ.अजित गोपछडे यांची नियुक्ती

News Desk

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या ५३ जागा

News Desk