HW News Marathi
शिक्षण

सासमीरा इंस्टिट्यूटमध्ये हिंदी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम 

रुणाली मोरे | हिंदी दिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी वरळीच्या सासमीरा इंस्टिट्यूटमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना भाषेचे महत्व लक्षात यावे यासाठी इंस्टिट्यूटमध्ये शिकत असलेल्या या विद्यार्थ्यांसाठी हा विषेश उपक्रम विद्यार्थ्यांना सोबत घेऊन राबविण्यात आला होता.

सदर कार्यक्रमात हिंदी कविता, नाटक, पथनाट्याचा समावेश होता. या उपक्रमात विविध प्रकारे हिंदी भाषेविषयी जनजागृती करण्यात आली.जवळपास ५०० हून अधिक विद्यार्थी सदर कार्यक्रमात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला शिक्षकांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले.

बीबीआयच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात हिरहीरीने सहभाग घेतलेला पहायला मिळाले. कार्यक्रमाला प्राचार्य रीतु भट्टाचार्य, प्राध्यापक सचिन मंडले आवर्जून उपस्थित राहीले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विद्यापीठ आणि महाविद्यालयीन अध्यापकांची मेगा भरती

News Desk

सीबीएसई १० वीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार

News Desk

मुंबईतल्या ३५ शाळा होणार आंतरराष्ट्रीय

News Desk
मनोरंजन

Ganesh Chaturthi 2018 | नानांच्या बाप्पाचे आगमन

News Desk

मुंबई | नाना पाटेकर या दर्जेदार अभिनेत्याची गणपतीवर दृढ श्रद्धा असून दरवर्षी ते आपल्या घरी गणपतीची मूर्ती बसवतात. त्यांच्या गणपतीला सेलिब्रेटीच नव्हे तर सामान्य लोक देखील मोठ्या संख्येने हजेरी लावतात. गणपतीच्या समोरील फुलांची आरास देखील ते स्वतः करतात. गणपतीच्या विसर्जनला देखील ते उपस्थित असतात. सेलिब्रेटी बाप्पा म्हणून नाना पाटेकर यांचा गणपती विषेश प्रसिद्ध आहे. नानांच्या या बाप्पाचे १३ सप्टेंबरला आगमन झाले.

 

Related posts

मल्लिकाने घेतली फस्ट लेडीची भेट

News Desk

वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे यांचा पियानो फ़ॉर सेल ।

News Desk

Sridevi Death Anniversary : श्रीदेवी यांच्या ‘या’ आवडत्या साडीचा होणार लिलाव

News Desk