HW News Marathi
शिक्षण

धनगर समाज सेवा संघ मुंबईच्या वतीने  बाबरवस्ती शाळेत शालेय वस्तूंचे वाटप 

सांगली | जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बाबरवस्ती( पांडोझरी) ता.जत जिल्हा सांगली येथे धनगर समाज सेवा संघ मुंबई यांच्या वतीने बाबरवस्ती शाळेत वह्या पेन व जिलेबी व पेढे वाटप करण्यात आले. मा.आनंदराव हाक्के यांच्या हस्ते वह्या व पेन वाटप करण्यात आले.

सामाजिक बांधिलकी जपणे व समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो.माणूस कितीही मोठा झाला तरी ज्या मातीतून आपण गेलोय त्या मातीला आपण कधीच विसरणार नाही.कारण या मातीतूंच माणूस म्हणून जगण्याचे बळ मिळाले आहे.असे उद्गार आनंदराव हाक्के यांनी काढले.

शाळेची गुणवत्ता व शाळेत राबवले जाणारे उपक्रम, वृक्ष संगोपन,बोलक्या भिंती पाहून ते भारावून गेले.दिलीप वाघमारे या शिक्षकांनी राबवलेल्या विविध उपक्रमाची दखल घेऊन या सेवा संघाचे पदाधिकारी गेल्या दोन वर्षांपासून शाळेला भेटी देतात व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सविता मोटे,व शोभा बाबर,कविता कोरे विशाल गोड,सत्यवान हाक्के,केरुबा गडदे,उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सुञसंचलन व आभार दिलीप वाघमारे यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

उद्यापासून अकरावीचं मिशन अॅडमिशन

News Desk

सर्जनशील मोफत कार्यशाळा

News Desk

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शुल्कामुळे  प्रवेश व परीक्षेपासून वंचित ठेवू नये

News Desk
देश / विदेश

रशियाचे राष्ट्रपती पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर

Gauri Tilekar

नवी दिल्ली । रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे आजपासून भारत दौऱ्यावर असणार आहेत. भारत आणि रशियामध्ये एस-४०० क्षेपणास्त्र करार होणार असल्याची माहिती मिळत आहे. या करारासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. एस-४०० क्षेपणास्त्र प्रणालीसाठीचा हा करार ५अब्ज डॉलरचा असणार आहे. पुतीन हे यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. तर शुक्रवारी पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यात चर्चा होणार आहे.

भारताने रशियाच्या ऊर्जा क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. भारत-रशिया या दोन्ही देशांचे मैत्रीपूर्ण संबंध आणि संरक्षण कराराच्या दृष्टीने पुतीन यांची ही भारतभेट अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. त्याचबरोबर अंतराळ क्षेत्रातील संशोधन आणि उर्जा क्षेत्रातील सहकार्याच्या मुद्द्यावरदेखील यावेळी चर्चा करण्यात येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०२२ साली मानवाला चंद्रावर पाठवण्याच्या मोहिमेसाठी रशिया भारताला प्रशिक्षण देण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे. या दौ-यात एस-४०० क्षेपणास्त्र प्रणालीसंदर्भात पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांच्यातअधिकृत चर्चा करणार आहेत, अशी माहिती रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. भारताची दरवर्षी होत असलेल्या द्विपक्षीय चर्चांमध्येदेखील रशियाचा समावेश आहे.

Related posts

रिझर्व्ह बँकेच्या ‘डिजिटल रुपी’ या डिजिटल चलनाची घोषणा

News Desk

“कपिल देवपेक्षा इम्रान खान खूप भारी क्रिकेटर होता”-माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाक

News Desk

…फक्त 10 वर्षांसाठी आरक्षण हवं होतं !

News Desk