HW News Marathi
देश / विदेश

ब्रिक्समध्येही ‘सबका साथ, सबका विकास’

शियामेन – चीनमध्ये सध्या सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेत दहशतवादाच्या मुद्यावर चीनला भारताला पाठींबा द्यायला भाग पाडल्यानंतर, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ सबका विकास’चा नारा दिला आहे. ते मंगळवारी ‘डायलॉग ऑफ इमर्जिंग मार्केट्स अँण्ड डेव्हलपिंग कंट्रीज’ या परिसंवादातबोलत होते.

दहशतवाद, सायबर सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनात पुढे येत असलेल्या देशांमध्ये सहकार्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील दशक आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे असणार आहे. ‘आमच्या विकासाची संकल्पना सबका साथ सबका विकास सिद्धांतावर आधारित आहे’, असेही पंतप्रधानया वेळी म्हणाले. या वेळी मोदींनी पुन्हा एकदा दहशतवाद, हवामान बदलाचे मुद्दाही उपस्थित केलेआणि हरित जगासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.पंतप्रधान आजच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत.

अतिरेकी कारवाया घडवून आणणारे, कट कारस्थान करणारे आणि सहकार्य करणा-यांना जबाबदार ठरविले पाहिजे, असा सूर या संमेलनातून उमटला. या दोन संघटनांसह अन्य अतिरेकी संघटनांवर कारवाईची मागणी ब्रिक्स देशांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन, ब्राझिलचे राष्ट्रपती माइकल टेमर आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती जैकब जुमा यांनी या अतिरेकी कारवायांचा कठोर शब्दांत निषेध केला. सर्वांनी मिळून या समस्येविरुद्ध लढले पाहिजे, यावर भर दिला.

दरम्यान, उत्तर कोरियाने केलेल्या अणू चाचण्यांचा भारतासह अन्य देशांनी ब्रिक्स परिषदेमध्ये निषेध केला. या मुद्द्यावर शांततेने आणि मुत्सद्देगिरीने तोडगा काढला जावा, असे मतही व्यक्त करण्यात आले. उत्तर कोरियाने रविवारी आतापर्यंतच्या सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली. तसेचनव्या क्षेपणास्त्र चाचणीच्या तयारीत असल्याचा दावा सोमवारी दक्षिण कोरियाने केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशातील ‘हे’ राज्य येत्या ७ एप्रिलपर्यंत होणार ‘कोरोना’मुक्त

swarit

CBSE चा १०वीचा निकाल आज जाहीर होणार !

News Desk

रमा देवी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी आझम खान यांनी लोकसभेत मागितली माफी

News Desk