HW News Marathi
शिक्षण

काय आहे जिल्हा युवा संसद?

मुंबई | ‘संकल्प से सिद्धी’ या भारत सरकारच्या अभियानातंर्गत संपूर्ण भारतभर एकाच दिवशी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ‘जिल्हा युवा संसद’आयोजित करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या ‘युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय’ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून हा उपक्रम भारतभर राबविण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठ अंतर्गत सर्व महाविद्यालयांमध्ये हा कार्यक्रम राबिविण्यात येणार आहे. मुंबई जिल्ह्यासाठी परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयामध्ये या युवा संसदेचे आयोजन केले जाणार आहे.

२२ व्या नॅशनल युथ फेस्टिवलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना या अभिनव उपक्रमाची घोषणा केली होती. ‘देशाच्या प्रत्येक जिल्ह्यामधून १८ ते २५ वर्षे वयोगटातील युवकांनी या संसदेमध्ये सहभागी होऊन देशाच्या विकासासंबंधी आपले विचार व्यक्त करावे’ ही यामागची मूळ संकल्पना आहे.

काय असणार युवा संसदेचे विषय ?

‘स्वच्छता’, ‘दारिद्र’,’ भ्रष्टाचार’, ‘आतंकवाद आणि राष्ट्रीय सुरक्षा’, ‘साम्यवाद’, ‘जातीयता’, ‘पर्यावरण सुरक्षा’ आदी. मुख्य विषय तसेच ‘डिजिटल इंडिया’ ‘नमामि गंगे’ ‘इंद्रधनुष्य’,’सुशासन’,’एक देश एक मतदान’, ‘जो खेलेगा वो खिलेगा-खेळ आणि फिटनेस चे महत्व भारतामध्ये जरुरी आहे का?’ आदी विषयांवर युवकांना आपली मते व्यक्त करता येणार आहेत. यासाठी २ मिनिटांचा कालावधी देण्यात येणार असून हिंदी किंवा इंग्रजी या दोन्ही भाषांमधूनच हे विचार मांडता येणार आहेत.

मुंबईसाठी कुठे कराल नोंदणी ?

युवा संसदेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी २ ते ४ ऑगस्ट या तीन दिवशी https://www.mdcollege.in/ या लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच अधिक संपर्कासाठी ९८६९६४२७९३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

प्रत्यक्षरीत्या सहभागी न होऊ शकणा-या विद्यार्थ्यांसाठी हे असतील पर्याय…

जे विद्यार्थी प्रत्यक्षरीत्या सहभाग घेऊ शकत नाहीत त्यांनी ९० ते १२० सेकंदाचा व्हिडीओ तयार करून nssunitmdcollege@gmail.com वर मेल करावा. सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय व नंतर राष्ट्रीय स्तरावरील(दिल्ली)येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा संसदेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

प्रत्यक्ष निवड चाचणीकरिता दि.६ व ७ ऑगस्ट रोजी महर्षी दयानंद महाविद्यालय,परळ (एन.एस.एस. युनिट) मध्ये सकाळी ९ ते संधया.५ या दरम्यान येणे आवश्यक आहे. याकरिता महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा इतर विद्यार्थी देखील सहभागी होऊ शकतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

व्यवसाय परीक्षेचा अर्ज भरण्याबाबत नांदेड आयटीआयमध्ये प्रशिक्षण                                                                                

News Desk

अमेरिकेत शिक्षणासाठी दरवर्षी घ्यावी लागणार परवानगी

News Desk

स्कूलबस चालकाचा मुलगा सीएसच्या परीक्षेत अव्वल

News Desk