मुंबई | बहुचर्चित ‘ठाकरे’ हा सिनेमा आज (२५ जानेवारी) सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. परंतु वाशी येथील आयनॉक्स थिएटरमध्ये मात्र ठाकरे सिनेमाचे पोस्टर्स थिएटर मालकाने न लावल्याचे कळताच शिवसैनिकांनी सकाळी आठ वाजता गोंधळ घातला. यावेळी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच थिएटरमध्ये सुरू असलेला चित्रपट बंद पाडण्यात आला.
#Maharashtra: Shiv Sena workers created ruckus inside the premises of a movie hall in Navi Mumbai yesterday as it did not display 'Thackeray' movie poster. The movie on Shiv Sena's Bal Thackeray has released today. pic.twitter.com/YwXv3GECUZ
— ANI (@ANI) January 25, 2019
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमा संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला आहे. बाळासाहेब हे महाराष्ट्रातील एक उत्तम राजकारणी आणि कला होते. यामुळे सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. परंतु या सिनेमा प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी शिवसैनिकांना पोस्टर न लावण्यावरुन आंदोनल केले आहे. ठाकरे हा चित्रपट मराठी बरोबरच हिंदी भाषेतही प्रदर्शित होत आहे.
तसेच ठाकरे सिनेमाबरोबरच कंगना रणावतचा बहुप्रतीक्षित मणिकर्णिका हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची निर्मिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर चित्रपटांचे दिग्दर्शन अभिजीत पानसे यांनी केले आहे. चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांची भुमिका नवाजुद्दीन सिद्दीकीने साकरली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.