मुंबई : मनोरंजन क्षेत्रात नेहमीच काही ना काही नवीन होत असते. आता संपूर्ण मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रातील कलाकाराच्या सहकार्याने “ आकापेला” या संकल्पनेवर आधारीत गाणे तयार केले आहे. काही दिवसातच लाखोंचे हिट्स या गाण्याला मिळत आहे. कौतुकांचा वर्षाव खुद्द अमिताभ बच्चन यांनी ट्वीट द्वारे केला. अमेय खोपकर यांच्या ए.व्ही.के एंटरटेन्मेंटच्या युट्युब चॅनलचा हा पहिला व्हिडीओ असून विनय प्रतापराव देशमुख सरसमकर यांची सकंल्पना व दिग्दर्शन केलेला हा व्हिडिओ आहे. पहिला मराठीतील माईम थ्रू टाईम मुळे लोकांपर्यंत पोहचलेला विनय देशमुख याचे हे दुसरे प्रसिद्ध होणारे गाणे आहे. ६६ कलाकार ४३ गाण्यातून एका“आकापेला”ची निर्मिती करण्यात आली आहे.
अमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंटने, विक्रांत स्टुडीओच्या सहयोगाने प्रस्तुत केलेल्या या व्हिडीओची निर्मिती स्वाती खोपकर यांनी केली आहे. तब्बल सहासष्ट कलाकार, चव्वेचाळीस विविध नवी आणि जुनी गाणी या सर्वाचे मिळून एक गाणे “आकापेला”. मराठी आणि हिंदीतील दिग्गज गायक, कलाकारांचा सहभाग या गाण्यामध्ये आहे. ‘लय भारी’, ‘येरे येरे पैसा’ अशा गाजलेल्या चित्रपटांचे आणि ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ या लोकप्रिय नाटकांचे निर्माते, अमेय विनोद खोपकर याची चित्रपट निर्मिती क्षेत्रात वेगळा ठसा उमटविलेला आहे.
हरिहरन, सोनू निगम, अवधूत गुप्ते, कौशल इनामदार, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, सुदेश भोसले आदी दिग्गज गायक कलाकारांनी मराठी मध्ये बहुचर्चित ठरलेल्या आणि गाजलेल्या विविध गाण्यांची ‘मेडली’ केली आहे. यामध्ये ब्लॅक ऍण्ड व्हाईट सिनेमा ते २०१८ सालच्या गाण्यांचा समावेश आहे.
सुप्रसिद्ध कलाकार झळकले आहेत. थोडक्यात सांगायचे तर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल असे वैविध्यपूर्ण गाण्यांचे मिश्रण आपणास या आकापेले संगीत प्रकारातील पहिल्या मराठी व्हिडीओ सॉंग मध्ये अनुभवायला मिळेल.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.