HW News Marathi
मुंबई

हिंदुजा महाविद्यालयाला अवैध पार्किंगचा विळखा, वाहतुक पोलिस शाखा बघ्याच्या भुमिकेत

मुंबई : दक्षिण मुंबईतील चर्निरोड येथील हिंदुजा महाविद्यालय मार्गाला अवैध पार्किंगचा विळखा पडला असून त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

वर्दळीचा असलेल्या या मार्गावर शाळा तसेच महाविद्यालय असल्यामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावरून चालताना अनेकदा अवैध पार्कींग केलेल्या वाहनांचा अडथळा निर्माण होत आहे संपूर्ण परीसर नो पार्किंग झोन असताना येथे असलेल्या वाहन दुरुस्तीच्या दुकानांमार्फत रस्त्याच्या दोन्ही बाजुला दुरुस्तीसाठी आलेली वाहने दुहेरी व तिहेरी रांगेत उभी केली जातात त्यामुळे या मार्गावरुन चालणा-या पादचा-यांना जागा शिल्लक राहत नाही.

याबद्दल अनेकदा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्थानिक वाहतूक पोलिसांपासून ते वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत व परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे तक्रार केली मात्र पोलिस प्रशासनाकडून ठोस कारवाई केली जात नसून पोलिस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे

महाविद्यालयीन विद्यार्थी प्रथमेश गीते यांनी माहितीच्या अधिकारात या वाहतुक कोंडीप्रकरणी माहीती मागवली असता वाहतुक पोलिस प्रशासनाकडून १२ वाहनांवर कारवाई केली असल्याचे सांगण्यात आले पोलिसांनी १२ वाहनांवर कारवाई केल्याचे सांगीतले असले तरी पोलिसांच्या कारवाईचा धाक येथील गॅरेज मालकांना आणि वाहनचालकांना बसलेला नसल्याचे निदर्शनास येते पूर्वी या ठिकाणी नो पार्किंगचे फलक लावण्यात आले होते मात्र अवैद्य पार्कींग करणा-यांनी हे फलक काढून टाकल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या मार्गावर येणारी इतर ही वाहने उभी केली जातात. अनेकदा शाळा तसेच महाविद्यालय सुटण्याची वेळ एक झाल्यामुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन तिथून बाहेर पडण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागते वाहतुक पोलिसांकडून याप्रकरणी ठोस कारवाई करुन अवैध पार्कींन न हटवल्यास विद्यार्थ्यी ठिया आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

येथील मोटर गॅरेज हेच अवैध पार्कींचे कारण असून मोटर गॅरेज हटवल्यास या मार्गावरील वाहतुक कोंडी प्रश्न सुटून वाहतुक सुरळीत होणार आहे हा वाहतुक प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही वाहतुक शाखेच्या अधिका-यांपासून वरीष्ठ पोलिस अधिका-यांपर्यंत तक्रारी केल्या आहेत मात्र पोलिस वाहतुक शाखा बघ्याची भुमिका बजावत असल्याने नागरीकांना वाहतुक कोंडीचा सामना कारावा लागत आहे या प्रकरणी वाहतुक पोलिसांनी योग्य ती कारवाई न केल्यास सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेवून ठिया आंदोलन करण्यात येणार आहे.

जनार्दन येडगे ( विद्यार्थी – टी.वाय बीएमएम )

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य रेल्वेने महापालिकेवर फोडले खापर

swarit

मुंबईकरांना मिळणार साताऱ्यातील ‘माण’ तालुक्याचा अनुभव

News Desk

दोन सुरक्षारक्षकांनी केला पाच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

News Desk