HW News Marathi
मनोरंजन

राम कदम पुन्हा चर्चेत, अभिनेत्री सोनाली बेंद्रे पडद्याआड ट्विटरद्वारे ट्विट

मुंबई | मुलीला पळवून नेण्यास मदत करण्याच्या वक्तव्यामुळे भाजपचे आमदार राम कदम अडचणीत सापडले होते. ‘एखादी मुलगी पसंत असेल, पण ती लग्नाला नकार देत असेल तर मला सांगा. तिला पळवून आणण्यात मी मदत करेन’, अशी मुक्ताफळे उधळणारे भाजपचे आमदार राम कदम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

अभिनेत्री सोनाली बेंद्रे पडद्याआड गेल्याचे राम कदम यांच्या अधिकृत ट्विटरद्वारे ट्विट करण्यात आले. थोड्यावेळात त्यांना आपली चुक लक्षात येताच त्यांनी ते ट्विट डिलीट केले आहे. त्यामुळे राम कदम पुन्हा एकदा ट्रोल होत आहेत. नुकतीच त्यांनी माफीनामा सादरही केला. पण आता तर खुद्द राम कदम यांनी आणखी एक वाद ओढावून घेतलाय. अभिनेत्री सोनाली बेंद्रेचं निधन झालं असं राम कदमांनी जाहीरच करून टाकल.

राम कदम यांनी आज दुपारी 1.50 च्या सुमारास एक टि्वट केल. या टि्वटमध्ये राम कदमांनी लिहिले की, हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमधली अभिनेत्री आणि एकेकाळी सर्व प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी आणि आपल्या अभिनयाने सर्वांचे डोळ्याचे पारणे फेडणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे पडद्याआड…यांचं अमेरिकेत निधन झालं आहे. भावपूर्ण श्रद्धांजली… मात्र थोड्याचवेळात आपली चूक लक्षात आल्यावर अर्ध्यातासानंतर त्यांनी ते टि्वट डिलिट केलंय. आणि “सोनाली बेंद्रे यांच्या निधनाबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होवो अशी मी प्रार्थना करतो’ अशी सारवासारव करत नवीन टि्वट केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सेक्सचे चार लक्षणे

News Desk

Vijay Diwas : अमेरिकन व सोव्हिएट हस्तक्षेप

News Desk

राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्तेच स्वीकारणार, कलाकारांनी केला इराणींना विरोध

swarit