मुंबई | हिंदी सिनेसृष्टीतील गाजलेले संस्कारी बाबूजी आलोकनाथ यांच्या अटकपूर्व जामिनाची मागणी करणाऱ्या अर्जावर आज (५ जानेवारी) दिंडोशी सत्र न्यायालय सुनावणी पार पडली आहे. या सुनावणी दरम्यान न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर असून आलोकनाथ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता ओशिवरा पोलीस आलोकनाथ यांना अटक करू शकत नाहीत.
Writer Vinta Nanda rape case: Dindoshi Sessions Court grants anticipatory bail to Alok Nath. (file pics) pic.twitter.com/CmvZi26qNO
— ANI (@ANI) January 5, 2019
प्रसिध्द तारा मालिकेच्या लेखिका-निर्मात्या विनता नंदा़ यांच्यावर २० वर्षांपूर्वी केलेल्या बलात्कारप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली आहे. #MeToo या मोहिमे अंतर्गत हे प्रकरण पुढे आले होते. या पार्श्वभूमीवर अटक टाळण्यासाठी आलोकनाथ यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दिंडोशी सत्र न्यायालयात दाखल केला होता.
आलोकनाथ यांच्यावर कलम ३७६ नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. निर्मात्या विनता नंदा यांच्यावरील 20 वर्षांपूर्वीच्या बलात्काराच्या आरोपाप्रकरणी या संपूर्ण प्रकाराची चौकशी करणाऱ्या ओशिवरा पोलिसांनी अनेकवेळा आलोकनाथ यांना समन्स पाठवले होते. मात्र, ते कधीच हजर झाले नाहीत.
#MeToo मोहिम
मीटू मोहीम अंतर्गत अभिनेता आलोकनाथ यांच्यावर अखेर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ वर्षांपूर्वी आलोकनाथ यांना बलात्कार केल्याचा आरोप फिल्ममेकर विनता नंदा यांनी केला होता. आलोकनाथ यांच्याविरोधात नंदा यांनी ८ ऑक्टोबरला एक लेखी तक्रारपत्र ओशिवरा पोलिसांना दिले होते. या तक्रारीची शाहनिशा केल्यानंतरच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. याप्रकरणी मंगळवारी २० नोव्हेंबरला ओशिवरा पोलिसांनी त्यांच्याविरोधात दखल पात्र गुन्ह्याची नोंद केली. मात्र अजून त्यांना अटक करण्यात आलेली नाही.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.