HW News Marathi
मनोरंजन

#MeToo संस्कारी बाबूजींवर बलात्काराचा गुन्हा दाखल

मुंबई | मीटू मोहीम अंतर्गत संस्कारी बाबूजी म्हणून प्रसिद्ध ओळखल्या जाणाऱ्या आलोकनाथ यांच्यावर अखेर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९वर्षांपूर्वी आलोकनाथ यांनी बलात्कार केल्याचा आरोप फिल्ममेकर विनता नंदा यांनी केला होता. आलोकनाथ यांच्याविरोधात नंदा यांनी ८ ऑक्टोबरला एक लेखी तक्रारपत्र ओशिवरा पोलिसांना दिले होते. या तक्रारीची शाहनिशा केल्यानंतरच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. याप्रकरणी मंगळवारी २० नोव्हेंबरला ओशिवरा पोलिसांनी त्यांच्याविरोधात दखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. मात्र अजून त्यांना अटक करण्यात आलेली नाही.

आलोकनाथ यांच्यावर मंगळवारी (२० नोव्हेंबर)ला दुपारी २.३५ वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. जबरी आणि अनैसर्गिक संभोग केल्याप्रकरणी भांदवी ३७६(१) आणि ३७७ ही कलमे त्यांच्यावर लावण्यात आली आहेत. नंदा यांचे आरोप खोटे असल्याचा दावा आलोकनाथ यांनी केला होता. २५ ऑक्टोबरला त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती, मात्र त्यांना दिलासा मिळाला नव्हता. अभिनेत्री संध्या मृदुल, दीपिका आमीन आणि रेणुका शहाणे यांनीही आलोक नाथसोबतचा आपला अनुभव माध्यमांसमोर व्यक्त केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#HappyBirthdayLataDi |… या सिनेमातून गाळली लता दीदींची गाणी

swarit

सेक्सचे चार लक्षणे

News Desk

आगमन बाप्पाचे | इको फ्रेंडली गणपती साजरा करण्यासाठी नाहर ग्रुप तर्फे दोनशे रहिवाशांना प्रोत्साहन

News Desk