नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांची तब्येत ठिक नसल्याने उपचारासाठी ते अमेरिकेला रवाना झाले आहेत. कपूर यांनी ट्विटरवरून त्यांनी प्रकृती ठिक नसल्याची माहिती दिली आहे. पत्नी नीतू कपूर आणि रणबीर कपूरसह अमेरिकेला रवाना झाले आहेत. खुद्द ऋषी कपूर यांनी ट्विटरवरून याची माहिती दिली. मी उपचारासाठी अमेरिकेला जात आहे, असे त्यांनी सांगितले. अर्थात त्यांना कुठला आजार झालाय, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
Hello all! I am taking a short leave of absence from work to go to America for some medical treatment. I urge my well wishers not to worry or unnecessarily speculate. It’s been 45 years “plus”of wear and tear at the movies. With your love and good wishes,I will be back soon!
— Rishi Kapoor (@chintskap) September 29, 2018
”हॅलो, मी वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेला जात असल्याने कामातून लहानशी सुट्टी घेतोय. माझ्या शुभचिंतकांना मी इतकीच विनंती करेल की, कुठलीही चिंता करू नका आणि तर्क काढू नका. मी ४५ पेक्षा अधिक वर्षांपासून सतत काम करतोय. तुमचे प्रेम आणि शुभेच्छांसाठी आभार. मी लवकरचं परत येईल..’, असे ट्विट त्यांनी केले. साहजिकचं त्यांचे हे ट्विट वाचल्याबरोबर चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. असंख्य चाहत्यांनी त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याची कामना केली अनेकांनी ते लवकर बरे व्हावेत,अशा शुभेच्छा दिल्यात आहेत. सूत्रांचे मानाल तर ऋषी कपूर यांची प्रकृती दीर्घकाळापासून खराब आहे.
अलीकडे आऱ के़ स्टुडिओतील गणपती विसर्जन मिरवणुकीत ऋषी कपूर सहभागी झाले होते. ६६ वर्षांचे ऋषी कपूर, अलीकडे १०२ नॉट आऊट आणि मुल्क या चित्रपटांत दिसले. लवकरच त्यांचा राजमा चावल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात पिता-पुत्राची कथा आहे. नाराज मुलाशी संपर्क साधण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेणाऱ्या पित्याची भूमिका त्यांनी यात साकारली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
previous post