HW Marathi
मनोरंजन राजकारण

सरकारवर टीका केल्यामुळे अमोल पालेकरांचे भाषण रोखले

मुंबई । सरकारवर टीका केल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचे भाषण रोखण्याचा प्रकार घडला आहे. मुंबईतील नॅशलन गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टतर्फे(एनजीएमए) काल (९फेब्रुवारी) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा प्रकार घडला आहे. अमोल पालेकर नॅशलन या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पालेकरांनी या संपूर्ण प्रकार प्रकाराबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

प्रसिद्ध कलाकार प्रभाकर बर्वे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अमोल पालेकर भाषणादरम्यान बोलत होते की, “आर्ट गॅलरीने कशी आपली स्वतंत्रता गमावली आहे. त्यावेळी अमोल पालेकरांनी आर्ट गॅलरीच्या कामकाजावरही प्रश्न उपस्थित केले.” पालेकरांना त्यांच्या भाषणादरम्यान केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या एक निर्णयाविरोधात टीक करण्यात  सुरुवात केली, त्यावेळेस कार्यक्रमाच्या मॉडरेटरने त्यांना त्यांचे मत व्यक्त करण्यापासून रोखले. पालेकरांच्या भाषणादरम्यान, या मॉडरेटरने त्यांना बऱ्याचदा रोखले. इतकेच नाही तर भाषण लवकर संपवण्यासही सांगितले.

Related posts

हा तर धनशक्तीचा विजय !

News Desk

शिवसेना आमदार विजय औटी यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड

News Desk

…जेव्हा गिरीश महाजन गरबा खेळतात

News Desk