HW News Marathi
मनोरंजन

अनु मलिक यांचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

मुंबई | बॉलिवूड चित्रपटांनंतर आता सुप्रसिद्ध गायक-संगीतकार अनु मलिक यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. ‘आसूड’ या आगामी मराठी चित्रपटासाठी अनु मलिकने आवाज दिला आहे. हा चित्रपट येत्या ८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनु मलिकने आपल्या अनोख्या आवाजाने बॉलिवूडमध्ये सुपरहिट गाणी गायली आहेत. ‘आसूड’ हा चित्रपट अत्यंत गंभीर प्रश्नावर भाष्य करत असल्यामुळे या चित्रपटाला तशाच प्रकारचे संगीत देण्यात आले आहे.

‘मराठी सिनेसृष्टीत मला काम करायचे होते. आसूड चित्रपटाच्या निमित्ताने मला ही संधी दिली. ‘आसूड’ या चित्रपटासाठी संगीत देणे हा माझ्यासाठी खूपच वेगळा अनुभव होता. यापुढेही मला मराठी चित्रपटांना संगीत देण्याची संधी मिळेल’, असेही अनु मलिकने सांगितले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निलेश जमळकर यांनी केले आहे. तर दिपक मोरे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आगमन बाप्पाचे | पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी शाडू मातीच्या सुबक मुर्ती

Gauri Tilekar

आता हिंदीतील हसवणूक पुन्हा सुरु

News Desk

गांधीजींना पहिल्यांदा कोणी म्हटले महात्मा ?

News Desk