HW News Marathi
मनोरंजन

अनुपम खेर यांचा एफटीआयआयला रामराम

नवी दिल्लीप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. एका इंटरनॅशनल शोमुळे व्यस्त असल्याचे कारण त्यांनी राजीनामा दिला आहे.अनुपम यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राजवर्धन सिंह राठोड यांना आपला राजीनामा पाठविला आहे.त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,”एका इंटरनॅशनल टीव्ही शो साठी आपल्याला २०१८ ते २०१९ दरम्यान ९ महिने अमेरिकेत रहावे लागणार आहे, यासाठी राजीनामा देत आहे”.

अनुपम हे दिवस खूप व्यस्त आहेत. ते फक्त बॉलीवूड चित्रपट नाहीत तर नाही तर परदेशातही बरेच प्रकल्पाचा भाग आहेत. अनुपम खेर ‘द एक्सीडेंट प्राइम मिनिस्टर’ मध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची व्यक्तिरेखा साकारत आहेत.अनुपम खेर हे भाजपच्या विश्वासातील समजले जातात. त्यामुळे त्यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु अनुपम खेर यांच्या आधी गजेंद्र चौहान यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. विद्यार्थ्यांनी या निवडी विरोधात निदर्शने देखील केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पारशी धर्मियांचे नववर्ष !

News Desk

किंग खानच्या ‘झीरो’ सिनेमाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील

News Desk

या दिवाळीत करून पहा गव्हाची शंकरपाळी

News Desk