HW News Marathi
मनोरंजन

आयपीएल सट्टा प्रकरणी ठाणे पोलिसांकडून अरबाजची चौकशी

मुंबई | आयपीएल सट्टा प्रकरणी बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची चौकशीला पोलिसांनी सुरुवात केली आहे. ठाणे पोलीस स्टेशनमध्ये सकाळी ११ वाजता अरबाज हजर झाला असून बुकी सोनू योगेंद्र जलाल (४१) या दोघांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. या चौकशीतून अजून किती हाय प्रोफाईल लोकांची नावेसमोर येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जलालने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आयपीएल सट्टा प्रकरणात अरबाज यांचा सहभाग असल्याच्या आधारावर ठाणे पोलिसांनी त्याची चौकशी करत आहेत. अरबाजने आतापर्यंत २ कोटी ८० लाखाचा सट्टा हरला असल्याची माहिती जलालने पोलिसांना दिली आहे. अरबाजने जलालकडे किती पैशांचा सट्टा लावला? त्यातील किती पैसे देणे बाकी आहेत? आदीची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी दिली आहे.

२७ मे रोजी मुंबईच्या वानखडे स्टेडिअमवर चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद असा शेवटचा सामना होता. या दिवशी देशभरातील ९८ सट्टेबाज जलालच्या संपर्कात असल्याची माहिती याआधीच ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली आहे. याच माहितीच्या आधारावर पोलिसांनी सोनू योगेंद्र जलाल याला २९ मे रोजी अटक करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गणेशोत्सव २०१८ | लालबागच्या राजाचे प्रथम मुख दर्शन

News Desk

 प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात

News Desk

स्टार प्रवाहवरील ‘राजा शिवछत्रपती’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार

swarit