HW News Marathi
मनोरंजन

आता एक एक धागा जोडणार हातमागाची कला

मुंबई | अव्वल दर्जाच्या हातमागाच्या आणि विणकामाच्या कलेत भारत नेहमीच अग्रेसर असल्याचं दिसून येतं. भारतातनिपुण कारागिरांची काहीच कमतरता नाही. कमतरता आहे ती या कारागिरांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळवूनदेण्याची. या कारागिरांच्या कलेला जागतिक स्पर्धेत उतरवायचं असेल तर सर्वात आधी त्यांची कला प्रत्येकमाणसांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. हीच गरज ओळखून ‘ आर्ट एक्स्पो संस्था’ दरवर्षी एका प्रदर्शनाचे आयोजनकरते. ज्यात भारतातल्या हातमाग व विणकामाच्या क्षेत्रात तरबेज असलेल्या कारागिरांच्या कलांचे सादरीकरणकरण्यात येते.

यावर्षीदेखील हीच परंपरा कायम राखत आर्ट एक्स्पो संस्थेने पारंपरिक हातमागकलेला प्रोत्साहन देणाऱ्याप्रदर्शनाचे आयोजन केले आहे. येत्या ५ ते ७ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० ते सायंकाळी ७:३० वाजेपर्यंत प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. मुंबईतील जुहू येथील कमला रहेजा कॉलेजमधील ‘किशनचंद वालेचा’ सभागृहात हे प्रदर्शनभरवण्यात येणार असून यात नानाविध तऱ्हेचे परंपरागत भारतीय दागिने, घर सजावटीच्या आकर्षक वस्तू,डिझायनर ड्रेसेस, साड्या , हस्तकलेच्या सुंदर वस्तू आदींचे प्रदर्शन या ठिकाणी भरणार आहे.

विशेष म्हणजे या प्रदर्शनात हातमाग व विणकाम क्षेत्रातल्या राष्ट्रीय पुरस्कार पटकवलेल्या विजेत्या कारागिरांचासहभाग आहे. भारतीय परंपरेचा ठेवा जपणाऱ्या या कलेला जगापुढे आणण्यासाठी व या क्षेत्रातल्या होतकरुकलाकारांना एकत्र आणून हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आर्ट एक्स्पो सातत्याने कार्यरत आहे. इतकंच नव्हेतर ह्या प्रदर्शनासाठी प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे. कलेची आवड असणाऱ्या व नवनवीन आकर्षक वस्तूंचीखरेदी करु पाहणाऱ्या चाहत्यांसाठी हे प्रदर्शन पर्वणीच ठरेल. त्यामुळे भारतीय कलेचा हा आगळावेगळा अविष्कारपाहण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी या प्रदर्शनाला जरूर भेट द्यावी, असे आवाहन आर्ट एक्स्पोच्या संचालिका‘उज्वल सामंत’ यांनी केले आहे.

काय आहे आर्ट एक्स्पोच्या या प्रदर्शनात ?

• हातमाग आणि विणकाम करण्याऱ्या भारतीय कलाकारांना प्रोत्साहन देणारे प्रदर्शन

• लाईव्ह भारतीय हातमाग आणि विणकामाचा अनुभव

• सर्वांना मोफत प्रवेश

• राष्ट्रीय पुरस्कार पटकवलेल्या विजेत्या कारागिरांचा सहभाग

• ५ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर २०१८ प्रदर्शन सकाळी १०:३० ते सायंकाळी ७:३०वाजेपर्यंत.

• विणकर आणि हॅण्डलूम डिझायनर्सचे ‘किशनचंद वालेचा’ सभागृहात पहिल्यांदा हे एकमेव विश्वसनिय प्रदर्शन

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Gandhi Jayanti : खादी व ग्रामोद्योग आयोगाकडून ‘खादी फेस्ट २०१८’चे आयोजन

Gauri Tilekar

जाणून घ्या…मकरसंक्रातीला स्नान-दानाला का आहे विशेष महत्त्व ?

News Desk

माटुंगा फुलमार्केटच्या बाप्पाला फुलांची आरास

News Desk