HW News Marathi
मनोरंजन

मेघा धाडे मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची विजेती

लोणावळा | पहिल्या मराठी बिग बॉस शोची अभिनेत्री मेघा धाडे ही विजेता झाली आहे. रविवारी झालेल्या अंतिम सोहळ्यात मेघा आणि पुष्कर जोग यांच्यात शेवटची लढत होती. यामध्ये मेघाने बाजी मारत शोच्या पहिल्या पर्वाची माजी मारली आहे. मेघाने सई लोकूर, पुष्कर जोग, आस्ताद काळे, स्मिता गोंदकर यांना मागे टाकत विजेते पद पटकावले. मेघाला बिग बॉसच्या ट्रॉफीसोबत ५० लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर पुष्कर जोगला समाधान मानावे लागले.

या अंतिम सोहळ्यात सर्व प्रथम शर्मिष्ठा राऊत त्यानंतर आस्ताद काळे आणि सई लोकूर हे बाहेर पडले. यानंतर विजेतेपदासाठी मेघा, पुष्कर आणि स्मिता यांच्यात चुरस सुरू होती. अंतिममध्ये मेघा आणि स्मिता यांच्यात होणार असे वाटल होते. परंतु स्मिता बाहेर पडली, त्यानंतर मेघा व पुष्कर यांच्यात अखेरची लढत झाली. पण, मराठी बिग बॉसच्या ट्रॉफीवर मेघाने आपले नाव कोरले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीरचक्र’ पुरस्काराने करणार सन्मानित

News Desk

आगमन बाप्पाचे | पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी शाडू मातीच्या सुबक मुर्ती

Gauri Tilekar

महाराष्ट्राची महती सांगणारे “माझा महाराष्ट्र” गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

News Desk