HW News Marathi
मनोरंजन

सवाई एकांकिका स्पर्धेत औरंगाबादची ‘मॅट्रिक’ ठरली सर्वोत्कृष्ट एकांकिका

मुंबई | संपूर्ण महाराष्ट्रातून सवाई एकांकिका स्पर्धेसाठी वेगवेगळ्या कॉलेजमधील विद्यार्थी वर्षभर मेहनत घेत असतात. वेगवेगळ्या स्पर्धांमधून सवाईला पात्र होण्यासाठी प्रयत्न करत असतात. ती सवाई एकांकिका शुक्रवारी (२५ जानेवारी) रात्री मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात पार पडली आहे. या सवाई एकांकिकेत औरंगाबादच्या नाट्यवाडा महाविद्यालयाची ‘मॅट्रिक’ या एकांकिकेला प्रथम पारितोषिक मिळाले आहे.

‘मॅट्रिक’ या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट एकांकिका याचबरोबर सर्वोत्कृष्ट लेखक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता हे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. खरे तर औरंगाबादपासून ते मुंबईपर्यंत या एकांकिकेचा प्रवास सोपा नव्हता. परंतु या मुलांनी कठोर मेहनतीने हे यश मिळवले आहे.

त्याचप्रमाणे मुंबईतील माटुंगा येथील रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाच्या एकांकिकेला ‘एका दशावतार’ द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना, सर्वोत्कृष्ट नेपथ्य, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सवाई एकांकिका द्वितीय क्रमांक असे चार पुरस्कार मिळाले. शिक्षण मंत्री विनोद तावडे देखील या एकांकिका पाहण्यासाठी येथे आले होते. रात्री ९ वाजता सुरू झालेल्या सवाई एकांकिका स्पर्धेचा निकाल आज सकाळी ७ वाजता जाहीर करण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटीएफने ऊधळला सलमानच्या हत्येचा कट

News Desk

Ganesh Chaturthi 2018 | मुंबईत हिऱ्यामध्ये अवतरले बाप्पा

News Desk

यंदा ‘या’ सोप्या पद्धतीने बनवा तिळाचे लाडू

News Desk