HW News Marathi
मनोरंजन

‘जे.जे.’मध्ये कोरिया-मुंबईतील ‘बियाँड द फ्रेम्स’ चित्रप्रदर्शन

मुंबई | भारत आणि कोरियामधील चित्रकला, शिल्पकला आणि प्रिंटमेकर्स कलाकारांचा महामेळावा सर जे. जे. कला महाविद्यालयात भरला आहे. याचे निमित्त आहे ‘बियाँड द फ्रेम्स’ चित्रप्रदर्शनाचे. १४ ते १८ ऑक्टोबरदरम्यान हे चित्रप्रदर्शन कलारसिकांसाठी खुले राहणार आहे. यामध्ये कोरियातील १२० तर मुंबईतील ७० हून अधिक कलाकार आपली कला सादर करणार आहेत. या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन आज सायंकाळी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झाले.

सध्या देशाबरोबरच विदेशातही कलेच्या क्षेत्रात अनेक अत्याधुनिक बदल आणि सुधारणा होत आहे. त्यामुळे देशाबाहेरील कला क्षेत्रात होणारे अत्याधुनिक बदल विद्यार्थ्यांना समजावेत, जागतिक दर्जाचा कलेचा आस्वाद विद्यार्थी आणि कला रसिकांना घेता यावा यासाठी या चित्रप्रदर्शनाचे आयोजन केल्याचे प्रा. विश्वनाथ साबळे यांनी सांगितले. ‘के-आर्ट फाऊंडेशन’च्या अध्यक्षा ह्यू सुक या प्रदर्शनाच्या मुख्य संकल्पनाकार व क्युरेटर आहेत, तर मुंबईतील जबाबदारी अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे, प्रा .डॉ.गणेश तरतरे, प्रा. अनंत निकम आणि प्रा.मधुकर वंजारी यांच्यावर आहे. प्रभारी कलासंचालक प्रा. राजीव मिश्रा व इंको सेंटरच्या संचालिका डॉ. रती जाफर यांचेही सक्रीय सहकार्य या प्रदर्शनाला लाभल्याची माहिती चित्रप्रदर्शनाच्या समन्वयिका व अधिव्याख्याता स्मिता किंकळे यांनी दिली. सर जे. जे. कला महाविद्यालय व दक्षिण कोरियातील के-आर्ट इंटरनॅशनल एक्स्चेंज असोसिएशन यांनी चेन्नईतील इंडिया-कोरिया सेंटरच्या सहकार्याने या चित्रप्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

दिग्गज कलाकार सहभागी

मुंबईतील ज्येष्ठ व समकालीन चित्रकार दीपक शिंदे, उत्तम पचारणे, गणपत माजगावकर, यशवंत देशमुख, विलास शिंदे, चंद्रकांत चन्ने, किशोर ठाकूर, प्रमोदबाबू रामटेके, तनुजा राणे, मीनल दमानी, निलेश किंकळे, संजय सावंत, आनंद प्रभुदेसाई, आर. बी. होले, राजेश पुल्लरवार, पांडुरंग ताठे यांच्या सोबत डॉ मनीषा पाटील, मोगलान श्रावस्ती, राजेंद्र पाटील यांच्यासह सर ज. जी. कला महाविद्यालयातील सर्व अध्यापक व वरिष्ठ विद्यार्थी प्रदर्शनात सहभागी झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पारंपारीक पोर्तुगीज कलकल

News Desk

पहिल्यांदाच ‘आरॉन’मध्ये शशांक केतकर आणि नेहा जोशी एकत्र

News Desk

दीपिकाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी…!

Gauri Tilekar