HW News Marathi
मनोरंजन

विकी कौशल आणि कतरिना कैफला सोशल मीडियावरून धमकी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई | बॉलिवुड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal )आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif ) या जोडप्याला जीवे मारण्याची धमकी आली आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफ या जोडप्याला सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी आली आहे. या प्रकरणी विकी कौशल यांनी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सांताक्रूझ पोलीस करत आहेत.

 

बॉलिवुडमधील प्रसिद्ध जोडीपैकी विकी कौशल आणि कतरिना कैफ ही एक आहे. या दोघांचे सोशल मीडियावर अनेक चहाते आहे. इन्सटाग्रामवर विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या पोस्टवर त्यांच्या चहात्यांच्या लाखोच्या संख्येने लाईक आणि मॅसेजचा वर्षाव होत असतो. परंतु, गेल्या अनेक दिवसांपासून विकी कौशल आणि कतरिना कैफला आदित्य राजपूत नावाचा एक मुलगा सातत्याने सोशल मीडियावर यांना स्टॉक करत होता. आदित्यला विकी कौशलने उत्तर दिल्यानंतर त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. यानंतर आदित्यने इन्सटाग्रामवर जीवे मारण्याचा मॅसेज पोस्ट केला होता. या पार्श्वभूमीवर विकी कौशल यांने अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सनी लिओनीचा बायोपिक वादाच्या भौऱ्यात

News Desk

नागराज मंजुळे आता मुख्य भूमिकेत दिसणार

Gauri Tilekar

उमेश आणि प्रियाची गुड न्यूज…!

News Desk